अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

अंबाजोगाई: नगरसेविका सौ.सविताताई लोमटे यांनी 250 गरजू कुटुंबांना केले अन्नधान्याचे वाटप

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील भारतीय जनता पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.सविताताई अनंतराव लोमटे यांनी बुधवार,दिनांक 15 एप्रिल रोजी 250 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून लॉकडाऊनच्या काळात दिलासा दिला आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या
माजी उपनगराध्यक्षा तथा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सौ.सविताताई अनंतराव लोमटे व सामाजिक कार्यकर्ते अनंतराव लोमटे यांच्या हस्ते 250 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी गरजूंना 15 दिवस पुरेल एवढे साहित्य वाटप करण्यात आले आहे. तसेच गरज भासल्यास आणखी काही गरजूंची यादी करून असे साहित्य वाटप केले जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनंतराव लोमटे यांनी दिली.यावेळी संकेत कराड, प्रसन्ना लोमटे,संदेश कराड, आदित्य भावठाणकार, अतुल जाधव यांची उपस्थिती होती.नगरसेविका सविताताई लोमटे व अनंतराव लोमटे हे दांपत्य सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेतात.भाजपाच्या नेत्या माजी मंञी पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रितमताई मुंडे,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.सविताताई लोमटे या सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभागी होतात. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून लोमटे परिवाराने अंबाजोगाईकरांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या 'लॉकडाऊन' मुळे हातावर पोट असलेले मजूर,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा 250 कुटुंबांना लोमटे कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे.अनंतराव लोमटे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे. हातावर पोट असणा-या, मोलमजुरी करणा-या ज्यात सफाई कामगार,धुणीभांडी,
घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना अन्नधान्याचे वाटप हे रितसर यादी करून किराणा दुकानातून 'सोशल डिस्टन्स' पाळून करण्यात आले.

'सोशल डिस्टन्स' पाळा कोरोना टाळा..!

अंबाजोगाई शहरातील जनतेने शासनाच्या सूचनांचेे पालन करावे.शहरात नवीन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला द्यावी.अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच कुटुंबातील एकानेच दिलेल्या वेळेत बाहेर येऊन आपले काम झाले.की, लगेच घरी जावे.शक्यतो घरीच थांबा.'सोशल डिस्टन्स' पाळा कोरोना टाळा असे आवाहन नगरसेविका सौ.सविताताई लोमटे यांनी केले आहे.

हताश शेतक-याला दिलासा

अंबाजोगाईतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भाजीपाला बाजारात एक शेतकरी टरबूज विक्री करण्यासाठी घेवून आला.जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर फळे किंवा भाजीपाला विक्री करण्यासाठी परवाना असणे गरजेचे असे सांगितले.परंतु या शेतक-याला माञ ते माहीत नव्हते तसेच त्याला उशीर झाल्यामुळे आता आपली टरबूज विक्री होणार नाही म्हणून तो शेतकरी हताश व निराश झाला.ही माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते अनंतराव लोमटे यांनी सदरील शेतक-याला दिलासा देत त्याच्याकडील सर्वच 700 टरबूज खरेदी करून बोधीघाट येथील घरोघरी जावून वाटप केले.