खासदार उन्मेश दादा पाटील यांची रेशन धान्य दुकानास प्रत्यक्ष भेट : मोफत तांदूळ लाभार्थ्यांशी साधला संवाद

शिधापत्रिका धारकांची केली विचारपूस : जळगाव लोकसभा मतदार संघातील शिधापत्रिकाधारक २५ लाख जनतेला मोफत प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटप सुरू : जनतेमध्ये समाधान

जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथील लक्ष्मी नगर चाळीसगाव परिसरातील रेशन धान्य दुकान क्रमांक आठ व नऊ येथे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप आज सकाळी खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या उपस्थित लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांशी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी संवाद साधला त्यांनी सोशल डीस्टन्स पाळत आपला लाभ घ्यावा.यावेळी लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे मोफत मिळत असलेला तांदूळ चांगल्या प्रतीचा असून आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही आभार मानतो अशी भावना व्यक्त केली. रेशन धान्य दुकानदार एस. सी. साबणे आणि अरुण साबणे यांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये समाधान
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेज मधील मोफत अन्नधान्याचे रेशन धान्य दुकानदारांकडून वाटप सुरू झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांतील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदळाचे वाटप सुरू करण्यात येत आहे.याचा सर्वत्र लाभ घेतला जात असून या संकटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीबांना मोफत धान्य मिळवून दिल्या बद्दल जनतेकडून आभार व्यक्त केले जाते आहे.

लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख कुटुंबांना लाभ

जळगाव लोकसभा मतदारसंघातील
जळगावात ७ लाख २०हजार ,
एरंडोल १ लाख ५० हजार ,
धरणगाव १ लाख ८०हजार,
पाचोरा २ लाख ९४ हजार,
भडगाव १ लाख ८५ हजार ,
चाळीसगाव ४ लाख २० हजार ,
अमळनेर २ लाख ६६ हजार,
पारोळा १ लाख ९७ हजार या सर्व सुमारे ५ लाख १८ हजार शिधापत्रिका धारकांच्या एकूण २५ लाख कुटुंब सदस्यांना या मोफत अन्नधान्य वाटपाचा थेट लाभ मिळणार आहे. हा लाभ प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळाचा लाभ तीन महिने मिळणार आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आपण घाबरू नका, घरातच रहा.प्रशासनास सहकार्य करा. असे आवाहन यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.