#CoronaVirus सोयगाव: लाॅकडाऊन सारख्या गंभीर परिस्थितीत नागरिकांचा बेकायदेशीर संचार व प्रवास

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगांव 15 कोरोना व्हायरसच्या गंभीर पार्श्वभूमीवर संपूर्ण देश 3 मे पर्यंत लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही कुठेही प्रवास करू शकत नाही. नागरिकांनी जिथे आहेत तिथेच घरात थांबायचे आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग अधिक वेगाने होतो. हा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे.
शासनाना कडून सर्व नागरिकांना आपापल्या घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतू अनेक नागरिक आपल्या गावी किंवा इच्छित ठिकाणी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून मिळेल त्या वाहनाने किंवा पाई अवैधरित्या प्रवास करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे. अापले असे बेजबाबदार वर्तन स्वतःसह संपूर्ण कुटुंब आणि सर्व देशातील जनतेला आणि परिणामी संपूर्ण राष्ट्राला धोक्यात आणू शकते. त्यामुळे नागरिकांची अशा प्रकारची बेजबाबदार कृती राष्ट्रघातक ठरू शकते. अापल्या अशा बेजबाबदार कृतीमुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणून नागरिकांनी लाॅकडाऊनच्या कालावधीत अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रवास करू नये.

लाॅकडाऊनच्या गंभीर परिस्थितीत सुद्धा लोक गुजरात, सुरत, पुणे-मुंबई सारख्या ठिकाणाहून खासगी व भाड्याने अथवा मिळेल त्या वाहनाने अवैद्य पणे आपापल्या गावी येण्याचा बेकायदेशीर प्रयत्न करत आहेत

पोलीसांनी अशा प्रकारच्या अवैध प्रवासी वाहतूकीवर कारवाई करणे सुर असुन योग्य कामासाठी च बाहेर पडावे असे सोयगांव पोलीस स्टेशन येथील ए पी आय सुदाम शिरसाट यांनी सांगितले.

संचारबंदी, लाॅकडाऊनच्या गंभीर परिस्थितीत अशा प्रकारे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व रस्ते वर अत्यंत निवांत फिरणारे नागरिकांना परिस्थितीचे जराही गांभीर्य कळत नाही ही अत्यंत खेदाची आणि दुर्दैवी बाब आहे. जगातील प्रगत देशांचे सर्वार्थाने कंबरडे मोडलेल्या आणि संपूर्ण जगात प्रचंड प्रचंड मनुष्यहानी केलेल्या महाभयंकर कोरोना व्हायरसच्या भारतातील संक्रमणा विषयी गांभीर्य न बाळगता आपण भारतीयांनी सरकारी सूचनांचे व नियमांचे उल्लंघन करू एवढे बेजबाबदार वर्तन करून चालणार नाही. आपले असे बेजबाबदार वर्तन आणि आपली बेकायदेशीर कृती आपल्या स्वतःसह, आपले संपूर्ण कुटुंब आणि परिणामी संपूर्ण राष्ट्रघातक ठरू शकते. मधून सर्व नागरिकांना विनंती आहे की, कोणीही अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर घराबाहेर पडू नये, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तरच आपण या महाभयंकर कोरोना व्हायरसच्या नायनाट करुया पोलिस प्रशासन, नगरपंचायत प्रशासन, तहसील प्रशासन ,तसेच स्वताच्या परिवाराकडे पाहुन योग्य कामासाठी आपण बाहेर निघावे असे तहसीलदार प्रविण पांडे,सचीन तामखडे,सुदाम शिरसाट यांनी नागरिकांना आवाहन केले आहे,