औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात उष्णवारे ,कोरोना पेक्षा उष्णतेची चिंता वाढली

सोयगाव,ता.१६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात गुरुवारी अचानक उष्णवारे वाहू लागल्याने या उष्णतेच्या लाटेत अक्खा तालुका होरपळला होता त्यामुळे नागरिकांना गुरुवारची उष्णता असह्य झाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले.
आधीच कोरोना संसर्गाची संचारबंदी आणि टाळेबंद त्यात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेच्या झळा यामुळे सोयगाव तालुका उष्ण झाल्याचे पहावयास मिळाले.जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्याला खानदेशच्या तापमानाचा फटका बसला होता.खानदेशात विक्रमी तापमानाची नोंद झाली या तापमानाचा परिणाम सोयगाव तालुक्यावर जाणवू लागला होता.गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात उष्णवारे वाहू लागले होते त्यामुळे नागरिकांना कोरोना संसर्गापेक्षा उष्णतेची चिंता लागून आहे.त्यामुळे कोरोना संसर्गापेक्षा उष्माघातने मृत्यू होण्याची शक्यता सोयगाव तालुक्यात बळावली आहे.

जळगाव जिल्ह्यातील तापमानाने गुरुवारी उच्चांकी ४२ अंश गाठला होता.त्यामुळे जवळच असलेल्या सोयगाव तालुक्याला या तापमानाचा फटका बसला होता.