कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

माणुस म्हणून आमचंही जगणं मान्य करा,धोतरेवाडीच्या गोपाळ,पारधी समाजाची मागणी, मूलभूत सुविधा तात्काळ पुरवा―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे चौसाळा ग्रामपंचायत अंतर्गत गोपाळ व पारधि समाजाची समाजाची ग्रामपंचायत कडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात असुन त्यांना पाणी ,रस्ता ,वीज , आणि स्वस्त धान्य दुकानातील धान्य देत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असुन डॉ.गणेश ढवळे यांनी ग्रामसेवक चव्हाण यांना विचारणा केली असता ऊद्या सकाळी १० वा.मी स्वत: धान्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

बीड तालुक्यातील मौजे चौसाळा ग्रामपंचायत अंतर्गत २५ कुटुंब असणारी गोसावी आणि पारधि समाजाची असुन त्याचे मतदार अंदाजे १०० च्या आसपास आहे.त्यांना पिण्याचे पाणी , रस्ता , शौचालय , घरकुल अशा कुठल्याही सुविधा उपलब्ध करून दिल्यानसुन कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ एकुण ६० लोकांपैकी केवळ ६-७ लोकांनाच मिळाला आहे.

अपंग रामा शिवा पवार : मी दोन्ही पायांनी अपंग असून हाताने खरडत चालतो.मलाअपंगाच्या एकाही योजनेचा लाभ नाही. माझी उपासमार होत असुन खायला काहीतरी व्यवस्था करण्यात यावी.

हरणाबाई लक्ष्मण माळी : माझं वय ७५ चर्या पुढं असून मूलगा ऊसतोडणी मजूर म्हणून कारखान्यावर असतो.इथल्या पुढारी लोकांनी निराधारांच्या पगारी चालु करतो म्हणून पैसै खाल्ले आणि मटणं,दारु साठी पण पैसै खाल्ले पण पगार काही चालू झाली नाही.

मनिषा दशरथ माळी : आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही,.वाडीत पाण्याची टाकी बांधली पण आमाला त्याचा उपयोग नाही उन्हाळा सुरू झाला असून २ किलोमीटर अंतरावर पाणी आणावे लागते म्हणून तात्काळ नळजोडणी करावी. अंगणवाडीत आमच्या मुलांना पोटभरून खाऊ दिला जात नाही.

विवेक कुचेकर :चौसाळा ग्रामपंचायत जाणिवपूर्वक धोतरेवाडी कडे दुर्लक्ष करत असुन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाहीत.यासाठी आम्ही निवेदन व २-३ वेळेस जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आंदोलन केले होते. यांना कुठलीही सुविधा उपलब्ध नाही.यापुढे यासाठी पून्हा आंदोलन उभारले जाईल.

डॉ.गणेश ढवळे: एकंदरीत धोतरेवाडी सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत आणि चौसाळा पासून केवळ २ कीलोमीटर अंतरावरील गोसावी आणि पारधि समाजातील लोकांची उपेक्षित वस्ती असुन जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. एकूण ६० लोकांपैकी केवळ ६-७ लोकांनाच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदूळ वाटण्यात आला असून ईतरांना नाही.याविषयी तहसीलदार किरण आंबेकर यांना फोन केला असता उचलला नाही तसेच तलाठी ढाकणे यांना फोन केला असतां त्यांनीही फोन उचलला नाही. ग्रामसेवक चव्हाण यांनी फोन उचलला असता याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ऊद्या सकाळी १० वा.विवेक कुचेकर यांना ज्यांना धान्य मिळाले नाही त्यांची यादी तयार करून ठेवा.मी सकाळी धोतरेवाडीत येऊन धान्य वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Back to top button