अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये हातावर पोट असणारे कामगार,स्वच्छता कर्मचारी,परिचारिका,ज्येष्ठ नागरीक,बाहेरगावाचे विद्यार्थी,प्रवासी यांना जेवण मिळावे या हेतूने 1 एप्रिल पासून शहराच्या विविध भागांतील लोकांना मोफत भोजन व फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे.भगवंत भवनच्या अन्नछञाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून आजपर्यंत 2500 हून अधिक गरजूंना ‘आपुलकीचे जेवण’ देण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी झोपू नये यासाठी मोफत भोजन हा महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा उपक्रम अंबाजोगाईत सुरू आहे.या उपक्रमांतर्गत दरदिवशी 125 ते 150 लोकांना एक वेळचे उत्कृष्ट व स्वादिष्ट मोफत भोजन देण्याचे काम भगवंत भवन व मिञ परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.या उपक्रमात सतीशराव देशपांडे,अनंतराव भोसले,
शरदराव देशपांडे,उमाकांत दिक्षित,जवाहर मर्लेचा,चिञाताई पालमकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी झोपू नये ही या मागची संकल्पना आहे.भगवंत भवनच्या वतीने दिल्या जाणा-या जेवणात पोळी,भाजी,भात, ठेचा व पिण्याचे शुध्द पाणी असा शुध्द,चविष्ट आणि ताजा परिपूर्ण आहार दिला जात आहे.भोजन वाटप व अन्न बनविण्यासाठी 15 लोकांचा सक्रिय सहभाग आहे.शहरातील विविध भागात डबे,पॅकेट्स गरजूं पर्यंत पोहोचविण्याचे काम ते करत आहेत.प्रसंगी अनेकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांबद्दल बोलताना सतीशराव देशपांडे म्हणाले की.सामाजिक बांधिलकीतून आम्ही आपल्या माणसांसाठी म्हणून ‘मोफत भोजन’ हा उपक्रम सुरू केला आहे. सुरूवाती पासूनच 125 ते 150 लोकांपासून सुरुवात केली.आजघडीला दिवसभरात तेवढ्याच नागरिकांपर्यंत आपुलकीने जेवण पोहोचवित आहोत.या उपक्रमाची माहीती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे,दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर,विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी,पञकार,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठीत नागरीक यांनी भेट देवून उपक्रमाचे स्वागत व भगवंत भवन परीवाराचे कौतुक केले आहे.या उपक्रमास पत्रकार,पोलीस कर्मचारी,आरोग्यसेवक,
नगरपरिषद,रिकबचंद सोळंकी यांचे आम्हाला सहकार्य मिळत असून हा उपक्रम गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचे समाधान आहे.
गरजूंनी भगवंत भवनच्या अन्नछञाचा लाभ घ्यावा
गरजू नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता आपुलकीने मोफत जेवण देणा-या भगवंत भवनच्या अन्नछञ उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.अंबाजोगाई शहर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत “भगवंत भवन अन्नछञ”,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक,विश्व सुपर मार्केट,तळमजला या ठिकाणी येवून मोफत भोजन उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सतीषराव देशपांडे व अनंतराव भोसले यांनी केले आहे.