जळगाव जिल्हा

सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड

जळगाव:आठवडा विशेष टीम―
देशातील शिक्षकांसाठी उपक्रमशील सर्जनशील तंत्रस्नेही व वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून महत्त्वपूर्ण असलेल्या सर फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक यांच्या जिल्हानिहाय निवड यादी राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ , राज्य समन्वयक राष्ट्रीय आदर्श शिक्षक सिद्धाराम माशाळे , महिला राज्य समन्वय क हेमाताई शिंदे , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप गुंड, राजकिरण चव्हाण यांनी दिनांक 14 एप्रिल 2020 रोजीजाहीर केले असून त्यात जळगाव जिल्ह्यातील स्वतःच्या दोन्हीही मुलांना कार्यरत जिल्हा परिषद शाळेतच दाखल करून राज्यात सर्वप्रथम 2010 साली स्वच्छेने सेमी इंग्रजी माध्यमाची जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढीसाठी व टिकण्यासाठी राज्यात सर्वप्रथम दूर दृष्टिकोनातून सुरुवात करणारे प्रयोगशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी सातत्याने शैक्षणिक सामाजिक साहित्य समाजसेवा क्षेत्रात राज्यभर उभारलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची सर फाउंडेशन च्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी निवड झाली आहे आहे.
किशोर पाटील कुं झर कर हे राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी अर्जुनराव साळवे यांचे नेतृत्वाखाली येऊन स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुणराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्य महासचिव तथा राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असून युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच ॲड मोहन भाई शुक्ला यांचे अध्यक्षतेखाली औदुंबर साहित्य रसिक मंच चे सहसचिव आहे त.
राज्यातील जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक उपक्रमशील शिक्षकांना सातत्याने मार्गदर्शन करणे त्याच जोडीने त्यांना मदत करणे तसेच राज्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे यासाठी त्यांचा सतत पुढाकार असल्याने राज्यभर त्यांची शिक्षकांसाठी पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून ओळख आहे .
जळगाव जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा देण्यात येणारा मानाचा राज्य शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य सुरूच आहे. सेमी इंग्रजी माध्यमाची वापर करून त्या विषयावर त्यांनी डायट जळगाव च्या प्राध्यापक डॉक्टर योगेश सोनवणे यांचे मदतीने केलेले कृती संशोधन ची राज्यस्तरीय कृती संशोधन राज्यस्तरीय संशोधन परिषदेसाठी विद्यापरिषद पुणे येथे सादरीकरणासाठी निवड झाली होती.

तसेच राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग 18 ट्रस्ट व ब्रिटीश कौन्सिल यांच्या मदतीने राज्यातील इंग्रजी विषयाचा दर्जा वाढीस लागावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या तेजस प्रकल्प साठी मागील दोन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या राज्यातील शिक्षकांच्या फोनेटिक इंटरव्यू मध्ये त्यांची तेजस प्रकल्पाच्या टॅग कॉर्डिनेटर पदी निवड झाली. दर बुधवारी एरंडोल तालुक्यातील केंद्रातील शिक्षकांना किशोर पाटील कुंझरकर इंग्रजी विषयाचे अध्यापनाचे धडे त्याअंतर्गत देतात.
बेटी बचाव बेटी पढाव साठी त्यांचे मोठे कार्य असून अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तालुका स्तर प्रशिक्षण यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते जबाबदारी पार पाडतात तसेच दरवर्षी बैलपोळ्याला तसेच विविध सणांच्या माध्यमातून ते शासकीय योजनांची जनजागृती करतात.
सर फाउंडेशन च्या माध्यमातून सन 2006 पासून राज्यभरात शासन व प्रशासनाच्या मदतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात सर फाउंडेशन च्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी त्यांची निवड झाल्याने राज्यातील व जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, पत्रकार बांधव, जिल्हापरिषदेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी,एरंडोल पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी,अधिकारी,शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी तसेच औदुंबर साहित्य रसिक मंडळाचे आणि मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आदींसह मित्रपरिवार व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच सर्व पक्ष पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रंजना पाटील जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र दादा पाटील, व सर्व जिल्हा परिषद सदस्य,जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी , सर्व मुख्याध्यापक सर्व केंद्रप्रमुख सर्व शिक्षक संघटना चे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी. एन .पाटील ,प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एस .अक लाडे, बी जे पाटील, विजय पवार डॉक्टर डी एम देवांग, उप शिक्षण अधिकारी सतीश चौधरी, राजेंद्र सपकाळे, एरंडोल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील,तंत्रस्नेही शिक्षक ग्रूप तसेच खाजगी शिक्षक संघटना आदींनी फोनवरून तसेच फेसबुक व्हाट्सअप ट्विटर सोशल मीडिया आधारे यथोचित कार्याची योग्य निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.