मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र उत्राण च्या वतीने ११ हजार रुपये मदत

जळगाव:आठवडा विशेष टीम―आध्यात्मिक सेवे सोबतच सामाजिक सेवा आनंदाने व आत्मीयतेने करावी असे श्री स्वामी समर्थ माऊली सांगतात. त्याच कर्तव्याची आठवण ठेऊन श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक व बालसंस्कार केंद्र उत्राण यांनी सध्या सुरू असलेल्या कोरोना या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाला थोड्या फार प्रमाणात आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यासाठी एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती श्री अनिलभाऊ महाजन यांच्या मध्यस्थीने म मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र उत्राण वतीने रक्कम रुपये 11,111/-(रुपये अकरा हजार एकशे अकरा मात्र )धनादेश म तहसीलदार सो,एरंडोल यांना देण्यात आला.धनादेश देताना एरंडोल पंचायत समितीचे उपसभापती श्री अनिलभाऊ महाजन सोबत प्रातिनिधिक सेवेकरी स्वरूपात जेष्ठ सेवेकरी श्री भिला कथ्थु महाजन,श्री विजय पाटील,श्री राजाराम माळी, श्री जगन्नाथ धामणे,श्री प्रमोद महाजन,श्री दिपक महाजन आदी उपस्थित होते.