जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाने दिला शंकररावांना दिलासा

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
परगावी गेल्यानंतर परत घरी जाण्याची ओढ सर्वांनाच असतेे.त्याचप्रमाणे शंकरराव खोडके (वय 70 वर्षे) हे येथील आश्रमात मागील 3 वर्षांपासून राहत आहेत.आता आश्रम हेच त्यांचे घर झालेले आहे.लॉकडाउन पूर्वी एका नातलगाचे निधन झाल्यामुळे ते राजेगाव (ता.माजलगाव,जि.बीड) या गावी गेले होते.अचानक दोन दिवसांत लॉकडाउनचे नियम अधिक कडक करण्यात आले.त्यामुळे शंकरराव खोडके हे त्याच गावात अडकून राहिले होते.परत आश्रमात येऊ शकले नाहीत.पण, घरच्याप्रमाणे आश्रमाची ओढ लागलेल्या शंकररावांचे मन माञ नातलगांत रमले नाही.त्यांना आल्या दिवसांपासून आश्रमाची ओढ लागली.काहीही करा पण,मला आश्रमात परत पोहोचवा अशी विनंती ते सर्व नातलगांना करू लागले.लॉकडाऊनमुळे नेमके काय करावे ते नातलगांना ही सुचत नव्हते.तर शंकररावांच्या काळजीने
आश्रमातील सर्वच जण अस्वस्थ होते.

याबाबत कळालेली माहीती अशी की,शंकरराव खोडके (वय 70 वर्षे) हे वृध्द अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमात मागील 3 वर्षांपासून आहेत.आता आश्रम हेच त्यांचे घर झालेले आहे.लॉकडाउन लागू होण्यापूर्वी नातलगाचे निधन झाल्यामुळे ते राजेगाव (ता.माजलगाव,जि.बीड) या गावी गेले होते.अचानक दोन दिवसांत लॉकडाउनचे नियम अधिक कडक करण्यात आले.त्यामुळे शंकरराव खोडके हे त्याच गावात अडकून राहिले होते.परत आश्रमात येऊ शकले नाहीत.पण,घरच्याप्रमाणे आश्रमाची ओढ लागलेल्या शंकररावांचे मन माञ घरी रमले नाही.त्यांना आश्रमाची आठवण येऊ लागली.काहीही करा पण,मला आश्रमात पोहोचवा अशी विनंती ते नातलगांना करू लागले.
लॉकडाऊन कालावधीत वृध्द शंकरराव यांना आश्रमात पोहोचवायचे कसे असा प्रश्न नातलगांसमोर उभा ठाकला.तेव्हा शंकरराव यांनी स्वतः जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर यांना संपर्क साधला असता.आश्रमाचे वतीने
शंकरराव खोडके यांना प्रथम तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना असा दिलासा देण्यात आला.मग प्रशासनाची रितसर परवानगी काढून प्रथम त्यांना गुरूवार,दिनांक 16 एप्रिल रोजी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्यांची तपासणी करून त्यांच्या हक्काच्या घरी म्हणजेच आश्रमात परत आणण्यात आले.आश्रमात आल्यावर शंकररावांना मोठा आनंद झाला.त्यांचे डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाचे संचालक पवन सोमनाथअप्पा गिरवलकर यांना शंकररावांनी मिठीच मारली.तर आश्रमातील शंकररावांच्या सहका-यांचे चेहरे उजळले होते.रक्ताच्या नात्यापेक्षाही मैञीचे व माणुसकीचे नाते मोठे असल्याचे यावेळी दिसून आले.