पीटीसी तर्फे कोरोना ग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी साठी ५१ हजारांची मदत

पाचोरा दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपयांची मदत भरीव मदत देण्यात आली आहे . संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, चेअरमन संजय नाना वाघ, मानद सचिव ॲड महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही टी नाना जोशी या पदाधिकाऱ्यांसह संस्थेच्या संचालक मंडळाने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती संदर्भात मदतीसाठी एकमुखी निर्णय घेतला . त्याआधारे मुख्यमंत्री सहायता निधी साठी ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेकडे सोपविण्यात आला . याप्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन व्ही टी जोशी, संजय सूर्यवंशी उपस्थित होते .
पीटीसी संस्थेच्या या मानवतावादी औदार्याचे कौतुक होत आहे.