मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब परराज्यातील १४ दिवस पुर्ण केलेल्या होम क्वारंटाईनांना घरी पाठवा ; त्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडलेत ,एकदिवसीय अन्नत्याग सुद्धा केला― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे चौसाळा येथे होम क्वारंटाईन केलेले ३२ जणांपैकी ५-६ जणांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी संपुन गेला असून त्यांची मानसिकता घरी तात्काळ जाण्याची असुन एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुद्धा केले होते, अशोकजी लोढा यांचा मायेचा आधार आहे परंतु घराची ओढ स्वस्थ बसु देत नाही म्हणुन विशेष बाब म्हणून वैद्यकीय चाचणीत दोषी नसणारे यांची त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री , गृहमंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, बीड तालुक्यातील मौजे चौसाळा येथे दि.३१/०३/२०२० रोजी नेकनुर ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे यांनी कंटेनर मधून अवैध प्रवास करणारे बेंगलोर येथिल ३२ जण जिल्हा संचारबंदी दरम्यान पकडले होते.त्यांची व्यवस्था चौसाळा येथिल आदर्श विद्यालय येथे करण्यात आली.त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले.

अशोकजी लोढा यांनी जेवणपानाची व्यवस्था केली : संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे

चौसाळा येथिल जि.प.सदस्य तथा गुरु गणेश मिशनरी जैन प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी या परराज्यातील होम क्वारंटाईन लोकांच्या चहा ,पाणी , जेवणाची सर्व आर्थिक जबाबदारी अशोकजी लोढा यांनी उचलली असुन मी व्यवस्थापक म्हणून हवं नको ते बघतो आणि आवश्यक गरजांची पुर्तता करतो.

परराज्यातील होम क्वारंटाईन ( कल्याणसिंग / धर्मेंद्र / आदि.) :

जिल्हा प्रशासनाने आम्हाला ३१ मार्च रोजी होम क्वारंटाईन केलेले होते १४ दिवसानंतर वैद्यकीय तपासणी करून पाठवून देऊ असे आश्वासन दिले होते.परंतु आज १९ दिवस झाले आहेत.आमच्यापैकी ४-५ जणांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे.धर्मेंद्रचे वडील वारले असुन आई एकटीच आहे ती आजारी असते. ,कल्याणसिंग यांचे मेव्हणे गंभीर आजारी होते त्यांना भेटायला ते निघाले होते , त्यांचाही मृत्यु झाला आहे.तसेच एकाची बहिण मृत्युमुखी पडली आहे,अशा ४-५ दुःख:द घटना आमच्या गावी घडल्या आहेत. आमची जेवणाची व्यवस्था मा.अशोकजी लोढा यांचे कार्यकते संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे यांनी घरच्यासारखी केली आहे,त्यांचे आम्ही आभारी आहोत. परंतु आमची सहनशीलता संपली असुन इथे अजून एकदिवस सूद्धा थांबण्याची मानसिकता नाही.आमच्या गावाकडे गव्हाचे उभे पिक रानात तसेच पडुन आहे, मशिन मिळत नाही आणि मजूरही मिळत नाही, वर्षभराचे पिकाचे नुकसान झाले तर आम्ही जगायचे कसे ??? म्हणून हात जोडून विनंती करतो आहोत आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या.

डॉ.गणेश ढवळे : यांची याठिकाणी राहण्याची सहनशीलता संपली आहे त्या मानसिकतेतून त्यांनी दि १५ एप्रिल रोजी एकदीवशीय अन्नत्याग आंदोलन केले होते.परंतू अशोकजी लोढा, सरपंच मधुकर तोडकर , डॉ.खाकरे ,वै.आ.प्रा.आ.कें.चौसाळा , ग्रामसेवक,तलाठी यांनी समजून सांगुन वरील परिस्थिती मा.राहुलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांना वांट्स अप द्वारे कळवली होती.याविषयी अशोकजी लोढा जिल्हाधिकारी बीड आणि तहसीलदार आंबेकर साहेब यांना बोलले आहेत.
त्यांच्या घरातील नातेवाईकांचे मृत्यू सारख्या गंभीर घटना आणि त्यांची मानसिकता पाहता त्यांना माणुसकीच्या भावनेतून घरी पाठवण्याची व्यवस्था करावी अशी नम्र विनंती जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई- मेल पाठवून करत आहे.