क्राईमबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमाजळगाव तालुकाविशेष बातमी

रस्त्यावर भांडण ,पोलीसांनी सगळ्यांवर केला गुन्हा दाखल ;पोलीसाची गाडी येताच भांडण करणारे रानावनात

माजलगाव:आठवडा विशेष टीम― किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद सुरु झाला. रस्त्यावर येवून दोन्ही गटातील पंधरा ते वीस जण एकमेकांना शिवीगाळ करु लागले. याची माहिती पोलीसांना झाल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली. पोलीसाची गाडी पाहताच भांडण करणाऱ्यांना कुठे पळावे ते कळेना.पोलीसांनी अकरा जणांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे घडला. अनिल कोकाटे, कृष्णा तौर, राधेशाम कोकाटे, प्रतिक कोकाटे, पंकज कोकाटे, विलास माने, उत्तम देशमुख, विष्णू आवघडे, सोनेराव आवघडे, नामदेव आवघडे, पवन आवघडे, नामदेव आवघडे (सर्व रा.हिवरा ता.माजलगाव जि.बीड) ही मंडळी रस्त्यावर भांडण करत होती. याची माहिती मिळताच पोनि.संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.इधाटे, मपोउपनि.माने, सफौ.खदीर, पोह.राठोड, पोना.मोरे, पोकॉ.बाबरे, मपोशि ढगे, मपोशि.सोळंके यांनी गावात भेट दिली. यावेळी वरील मंडळी भांडण करतांना पोलीसांना आढळून आली. त्यामुळे यांच्यावर पोना.विलास खराडे यांच्या फिर्यादीवरुन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे बेकादेशीर जमाव केल्या प्रकरणी कलम १८८, २६९, १४३, ३२३, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button