परळी दि. ३१:राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मंजूर करून आणलेल्या तालुक्यातील तळेगांव आणि पांगरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन उद्या (ता. १) अधिकृतपणे त्यांच्या हस्ते होणार आहे.
ना. पंकजाताई मुंडे यांनी परळी तालुक्यात १५ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तर सहा ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या ना पंकजाताई मुंडे यांनी विकास कामे करतांना भेदभाव न करता मतदारसंघातील प्रत्येक गावांत निधी दिला आहे. तळेगांव येथे ७६ लाख रुपये खर्च करून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना मंजूर केली असून त्याचे कामही पुर्ण झाले आहे, या योजनेचे लोकार्पण उद्या दुपारी १ वा. त्यांच्या हस्ते होणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पांगरी येथे ८९ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर केली असून त्याच्या कामाचा शुभारंभ ना पंकजाताई मुंडे उद्या करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे आवाहन ग्रामस्थ व भाजपच्या पदाधिका-यांनी केले आहे.