विजेची तार तुटून बैल, म्हैस जागीच ठार

माजलगाव दि १७:आठवडा विशेष टीम― इरला येथे गोठ्यावर विजेची तार तुटून वाडल्याने गोठ्यातील बैल व म्हैस जागीच तडफडून मेल्याची घटना घडल्याने शेतकयांचे जवळ पास लाखाच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे इरला येथील मनोहर राधाकिसन काठवडे हे शेतकरी राहतात काल दि १७ रोजी सकाळी अचानक त्यांच्या दारासमोरील गोठ्यावर विजेची तार तुटून पडली यात गोठ्यात बांधलेला बैल ( ६० हजार ) व दुभती म्हैस ( ७० हजार )यांचा अक्षरशः तडफडून जागीच मृत्यू झाला यामुळे शेतकऱ्यांना जवळपास १ लाख ३० हजार रुपयांचा फटका बसला आहे विद्युत मंडळाचा गलथान कारभारास नागरिक वैतागले असून वारंवार अशा घटना घडत आहेत तालुक्यातील अनेक गावांत पोल वाकडे झुकलेले ,खराब तर अनेक ठिकाणी पोल वरील तारा लटकत असलेल्या पहावयास मिळतात विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्याना वर वार सांगूनही ते लक्ष देत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले सुदैवाने या घटनेत इतर नुकसान झाले नाही सदरील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानिकची भरपाई विद्युत मंडळानेच द्यावी अशी मागणी गावकरी व खुद्द मनोहर काठवडे यांनी केली आहे