कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

शहरात बनावट अवैध दारुची बेभाव विक्री ?

बीड:आठवडा विशेष टीम―कोरोना महामारीच्या या भिषण काळात सर्वत्र जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे देशीविदेशी बिअरबार, परमिट रूम, वाईन शॉप यांना बंदी घालण्यात आलेली असताना सध्या मात्र शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होताना दिसत आहे. बनावट तसेच हातभट्टीचा मोठा साठा निर्माण केला जात असून हस्तकांमार्फत राजरोसपणे शहरात देशी-विदेशीचा खेळ बिनबोबाटपणे सुरु आहे. यामुळे तळीरामांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असुन अवैध दारू घेण्यासाठी वेगवेगळ्या परिसरातून तळीराम ठरावीक ठिकाणी गर्दी करत आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा धोकाही निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे दारू बंदी अधिकारी डोळेझाक करीत झोपले की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागात डी कंपनीचा दारूचा माल विक्रीसाठी आला असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत असून ही देशी- विदेशी दारू चढ्याभावाने विक्री करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम करत आहे. ५५ रूपयांची देशी दारू १५० रूपयाला तर १४० रूपयांची विदेशी दारू बॉटल ३४० रूपयांना तर बिअर १८० रूपयांची ४०० रूपयाला आहे ? बीअर विकली जात असल्याची माहिती तळीरामांमधून मिळाली आहे. गंभीर बाब म्हणजे ही दारू बनावट ? असल्याचेही बोलले जात आहे. अनेक परिसरात सर्रासपणे या दारूची विक्री होत असून अनेक ठिकाणी पोलिसांच्या मेहरबानीनेच हे धंदे होत असल्याचेही बोलले जात आहे. एसपी साहेब दारू बंदी अधिकाऱ्यांना खाकी दाखवा. बंदी असताना दारू विक्री करणे हा गुन्हाच आहे आणि त्यातच बनावट चढ्या भावाने विक्री केली जात आहे. बनावट दारू विक्री करणाऱ्यांना एमपीडी तसेच रासुका लावावा. जेणे करून या गंभीर परिस्थितीमध्ये आर्थिक फायद्यासाठी तळीरामांच्या जिवनाशी खेळ थांबवला जाईल.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?