कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या कोरोना पासून सुरक्षेसाठी आठशे थर्मल गन्स, ५५ लक्ष २२ हजार रुपये निधीची तरतूद

बीड:आठवडा विशेष टीम―कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असून जिल्ह्यात यामुळे नागरिकांना भविष्यात देखील सुरक्षित ठेवता यावे यासाठी करण्यात येणारा उपाययोजनांमध्ये वाढ करण्यात येत असून पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी यासाठी पुढाकार घेत विविध उपाययोजनांना तातडीने मंजुरी दिली आहे.
सदर साहित्य जिल्ह्यात उपलब्ध व्हावे म्हणून 15 एप्रिल पासून पाठपुरावा करण्यात आला
यामुळे जवळपास ५५ लक्ष २२ हजार रुपये निधी मधून च्या ८०० थर्मल गन्स जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या आहेत त्या पैकी ५५० उपलब्ध झाल्या आहेत २५० लवकरच प्राप्त होणार आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सांगितले.
याचाच भाग म्हणून कोरोना संसर्गाची बाधा झाल्यानंतर लक्षणे दिसून येतात सदर लक्षणे तपासणीसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेत 800 थर्मल गन्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालक मंत्री श्री मुंडे यांनी दिले होते . याचा उपयोग प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन सर्वेक्षण करणारे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच रुग्णालय मध्ये व विविध चेकपोस्ट च्या माध्यमातून तपासणी करणारे पोलीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना संबंधित लक्षणे असणारी व्यक्ती यांच्या माध्यमातून तात्काळ ओळखता येते
जिल्ह्यात प्राप्त झालेल्या या थर्मल गन चा वापर लगेचच सुरू करण्यात येणार असून यासाठी सदर साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा यापासून बचाव करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी माहिती दिली की जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तपासणी केल्या जाणाऱ्या तालुका व गाव पातळीवरील शासकीय रुग्णालय व स्थापन केलेल्या 450 पथकांना या थर्मल गन्स उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा १०० अंश तापाचे प्रमाण तात्काळ तपासले जाते व पुढील उपचार व कार्यवाहीसाठी त्याचा उपयोग होतो.


Back to top button