कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

महाजनवाडी दलित वस्तीवरील महिलांचा पाण्यासाठी हंडे घेऊन डॉ गणेश ढवळे यांच्या घरी ठीय्या ;गटविकास अधिकारी तुरुकमारे यांच्या आश्वासनानंतर माघार

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे महाजनवाडी येथिल दलित वस्ती मध्ये पिण्याचे पाणी , रस्ते , निराधारांच्या पगारी धनदांडग्यांच्या घशात याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी गटविकास अधिकारी रविंद्र तूरुकमारे यांना माहिती देऊन आठवडाभरात पाण्याची सोय करण्यासाठी ग्रामसेवक सय्यद यांना सांगतो म्हणाले. त्यानंतर आज महिलांनी सरपंच गणेश बाबासाहेब हिंदोळे यांनी दलित वस्त्यांमधील महिलांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या दारात जाऊन पाणी घ्या असे उद्दामपणे सांगितले त्यानंतर महिलांनी राजेभाऊ मारोती क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हंडे घेऊन लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांचे घर गाठले.

अप्रुगा नारायण बोराडे , वंदना चंद्रसेन बोराडे, सीमा नवनाथ बोराडे, नवनाथ बोराडे, गंगाधर बोराडे , महावीर बोराडे,राजेभाऊ मारोती क्षीरसागर , अनिल क्षीरसागर – दलित वस्ती ग्रामस्थ महाजनवाडी : आमच्या गावात दलित वस्ती मध्ये पिण्याचे पाणी, शौचालय, नाही पिण्याचे पाणी ३ कीलोमीटर अंतरावरील श्रीमंत तात्या यांच्या खाजगी बोअरवेल वरुन आणावे लागते, सिमेंट रस्ता मधिल लोखंडी गज बाहेर पडलेत , मुलं त्यात पाय अडखळुन पडतात. गावातील ९५ टक्के धनदांडगे म्हणजे बागायतदार , नोकरदार यांच्या घशात घालताना प्रत्येकी ५००० रु मागितले जाते. पगार वाटताना वाटणारा आणि सरपंच प्रत्येकी ५० रु दर महीन्याला घेतो. सरपंचांनी सांगितले म्हणूनच राजेभाऊ मारोती क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डॉ.गणेश ढवळे यांच्या दारात आलो आहोत.

सय्यद ग्रामसेवक महाजनवाडी : डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी ग्रामसेवक सय्यद यांना फोन करून विचारणा केली असता सध्या मी बीडमध्ये असुन वडीलांना घेऊन दवाखान्यात चाललो आहे,मी उद्या गावात येऊन बघतो.

रविंद्र तुरुकमारे साहेब ( गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड ): मी सरपंच गणेश बाबासाहेब हींदोळे यांच्याशी बोललो आहे दोन दिवसांत दोन बोअरवेल घेणार असुन एक बोअरवेल दलित वस्ती मध्ये घेतला जाईल.

डॉ.गणेश ढवळे: महाजनवाडी येथिल दलित वस्त्तीमध्ये मुलभुत सुविधांचा अभाव असून पिण्याचे पाणी , शौचालय , रस्ते, आणि निराधारांच्या पगारी मधे मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असुन धनदांडग्यांच्या नावे निराधारांच्या पगारी जमा केल्या जात असून सरपंच आणि तलाठी यांच्यासंगनमताने अपहार झाला असुन यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी करावी यासाठी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री , अर्थमंत्री , ग्रामविकास मंत्री , समाजकल्याण मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलव्दारे पाठवले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?