#CoronaVirus औरंगाबाद: महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे ‘डोअर स्टेप ‘सुविधा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सध्या देशासमोर कोरोना रुपी महा संकट उभे ठाकले असताना अशा परिस्थितीत लोकांना बँकेच्या कामासाठी त्रास सहन करावा लागू नये याकरिता महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे स्टेप व एमजीबी कस्टमर सर्व्हिस पॉइंट सेवा सुरू केलेली आहे.
या योजनेअंतर्गत बँकिंगची अनेक कामे घरी बसल्या व ग्राहक सेवा केंद्रांवर करण्यात येत आहेत. अगदी तुम्हाला पैशाची गरज असेल ते देखील ग्राहकांच्या घरी पोहोचते करण्यात येत आहेत. याआधी ही सुविधा केवळ दिव्यांग ग्राहक व जेष्ठ नागरिकां साठी होती. आता मात्र ज्यांनी केवायसी अपडेट केले, त्या सर्व खातेदारांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. हे सुविधा सोयगाव तालुक्यातील घोसला, उमर विहिरे येथे राबविण्यात येत आहे व निराधार लाभार्थींचे उंबरविहिरा ग्राहक सेवा केंद्रात हे काम करण्यात येत आहे. गावातच पैसे मिळू लागल्याने लोकांची चांगली सोय होत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅगनॉट चे ग्राहक सेवा संचालिका सुषमा समाधान घुले यांनी ही सेवा गावात कस्टमर मध्ये सोशियल डिस्टन्स चा वापर करून हॅड वॉश, सॅनिटायझर व फेस मास्क इत्यादीचा वापर करून हे बँकेची सेवा गावकऱ्यांकडून राबवून कोरो कोणाच्या प्रसार रोखण्याचे प्रयत्न केले आहे.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन खात्यात प्रतिमहिना पाचशे रुपये जमा होत आहे व किसान सन्मान निधी अंतर्गत दोन हजार रुपयांचा हप्ता ही तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा झाली आहे अशा लोकांना पैसे काढण्याची सुविधा उमरगा भोसला तालुका सोयगाव येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आता बँक मध्ये तेथे मानण्याची आवश्यकता नसल्यामुळे लोक डाऊन मध्ये ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती ग्राहक सेवा केंद्राच्या संचालिका सुषमा समाधान घुले यांनी दिली आहे.