ग.स.सोसायटी जळगाव व पारोळा शिक्षक पतपेढीची यंदा होणारी पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही – किशोर पाटील कुंझरकर

वडिलांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त किशोर पाटील कुंझरकर यांची घोषणा

शैक्षणिक सामाजिक चळवळी तील कार्य सुरूच राहणार

जळगाव:आठवडा विशेष टीम―
जळगाव जिल्ह्यातील ग. स .सोसायटी तसेच पारोळा शिक्षक पतपेढी ची सन 2020 मध्ये म्हणजे यंदा पंचवार्षिक निवडणूक होत आहे. आपण सदरील निवडणूक रिंगणात राहणार नसल्याची मोठी घोषणा किशोर पाटील कुं झर कर यांनी आज दिनांक 18 एप्रिल रोजी प्रतिनिधी जवळ बोलताना केली. सन 2015 मध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पॅनल चा जास्त आग्रह असल्याने कुठलीही तयारी नसताना अपघाताने आपण ग .स .सोसायटी जळगाव मध्ये लोकशाही पॅनल कडून उमेदवारी केली. यश, अपयश अथवा कोणाची आपल्याला अजिबात कधीच भीती नसून वैयक्तिक पातळीवर चालू पंचवार्षिक निवडणूक आपण कुठल्याही परिस्थितीत लढवणार नाहीत अशी घोषणा केली. त्यानुषंगाने कुठल्याही ग. स .सोसायटी अथवा पारोळा शिक्षक पतपेढीच्या निवडणूक लढविणाऱ्या गटाने अथवा व्यक्तीने कोणीही आपणास त्या अनुषंगाने स्पर्धक मानू नये किंवा गळ घालू नये ,सर्वजण आपले मित्र असणे वसुधैव कुटुम्बकम नुसार आनंददायी असून अशी माझी आज वडिलांच्या पुण्यस्मरण तपपूर्ती 12 व्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना विनंती असून माझ्यासाठी सर्व क्षेत्रीय जण सारखेच आदरणीय आहेत असे राज्यातील शिक्षण विभागाच्या शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक ,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच मराठा सेवा संघ, औदुंबर साहित्य रसिक मंचचे पदाधिकारी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री किशोर पाटील कुंझरकर यांनी आज दिनांक 18 एप्रिल2020 शनिवार रोजी आपले वडील सेवाभावी आदर्श शिक्षक स्वर्गीय तात्यासाहेब रमेश सहादु पाटील यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मनमोकळे करताना म्हटले.राज्यातील जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकारी तसेच शैक्षणिक, सामाजिक ,साहित्यिक , पत्रकारिता, समाजसेवा,क्षेत्रातील सर्व विचारधारांचे सर्वच मला कायम आदरणीय वंदनीय असून सर्वच आपले जवळचे वाटतात व जवळचे मित्र आहेत.सर्व गट आपले मित्र आहे असे आपण मानतो.

आपल्या परिवारातून कुंझर गावातून देखील ग्रामपंचायत अथवा कुठल्याही संस्थेच्या निवडणुकीत कधीच कोणीच भाग घेतला नाही यंदा होणाऱ्या कुंझर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत कोणीच उमेदवारी करणार नाही.
जे जे जेथे जेथे चांगले करता येईल मदत करता येईल तेवढे मात्र शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ हेतूने कार्य सुरूच राहील असे त्यांनी म्हटले.
आपल्याला सर्वांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत खूप काही मिळाले असून सेवा परमो धर्म नुसार जोडलेले माणुसकीचे नाते माणसं टिकवून ठेवायचे हाच आपला वडिलांच्या तपपूर्ती बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त संकल्प असल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.
दरम्यान मागील पंचवार्षिक तुलनेत या पंचवार्षिक मध्ये किशोर पाटील कुं झरकर यांचा व्यक्तिशः सर्वांशी थेट संपर्क वाढला होता. त्यांचे नाव सर्वपरिचित व आदरणीय झाले होते व ते स्वतःचे पॅनल टाकतील अशी चर्चा असताना त्यांनी ग स पंचवार्षिक निवडणूक न लढविण्याची केलेली घोषणा सर्वांसाठी धक्कादायक मानली जात आहे.