कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाबीड जिल्हा

सतत दांडी बहादर पाटोदा नगरपंचायत सीईओच्या खुर्चीला सभापती राजू जाधव यांनी हार घालून केला निषेध

पाटोदा:गणेश शेवाळे―संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या उच्चाटना साठी सरकारने लॉकडाऊन करुन युध्द पातळीवर उपाययोजना चालु आहे .मात्र पाटोदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले हे सतत गैरहजर राहत असल्याने सभापती राजु (भैय्या) जाधव व अन्य नगरसेवकांनी पंचनामा करुन खुर्चीला हार घातला व लिहले ' मी सी ई ओ सदा गैरहजर कोरोना च्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन आहे .प्रत्येक विभाग प्रमुखांनी मुख्यालयी हजर रहावे असे सक्त आदेश असतानाही पाटोदा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शशिकांत भोसले हे सतत गैरहजर राहात असल्याने पाटोदा नगरपंचायत क्षेत्रात कोणतीही उपाययोजना करता येत नाही .कोविड १९ च्या बाबतीत आतापर्यंत जे कामे झाली ती आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती राजु (भैय्या) जाधव , नगरसेवकांनी स्वनिधीतुन केली आहेत मात्र सीओ शशिकांत भोसले हे पाटोदा शहरास वा-यावर सोडुन बेपत्ता आहेत .लॉकडाऊन च्या सुरुवातीला उपविभागिय अधिकारी नम्रता चाटे ,तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी बोलाविलेल्या महत्वाच्या बैठकिसही भोसले हे गैर हजर होते .त्याही वेळी सीओ यांच्या गैरहजेरीचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते .पाटोदा नगरपंचायतने आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.नगरपंचायतचे कर्मचारीही असुरक्षित आहेत .बीड जिल्ह्यातील इतर नगरपंचायतने कोविड-१९ रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालु आहेत मात्र पाटोदा शहरात सीओ सतत गैरहजर राहात असल्याने कोणतीही उपाययोजना करता येत नाही .शशिकांत भोसले हे मुद्दामहुन गैरहजर राहात असल्याने आरोग्य सभापती राजु( भैय्या) जाधव यांनी निवेदन देऊनही काही सुधार नसल्याने .आज दि १७ रोजी. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आरोग्य सभापती राजु (भैय्या) जाधव , नगरसेवक यांनी त्यांच्या खुर्चीस हार घालुन लिहले मी सीई ओ सदा गैरहजर .व कक्ष अधिका-यांकडुन पंचनामा लिहीला तर पचंनाम्यावर नगरपंचायतच्या सर्व कर्मचा-यांच्या सह्या आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?