औरंगाबाद: सोयगाव तहसील कार्यालयाचा जंतुनाशक मार्ग

तहसीलदार प्रवीण पांडे यांची संकल्पना

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील
तातडीच्या शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांचे निर्जंतुकीकरण व्हावे आणि महसूल कर्मचाऱ्यांची सुरक्षा या हेतूने तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या जंतुनाशक मार्गाची शनिवारी उपविभागीय अधिकारी ब्रजेश पाटील यांनी पाहणी करून सोयगाव पॅटर्न सिल्लोडला राबविण्यात येणार असून या प्रकारचा जंतुनाशक मार्ग सिल्लोड तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात उभारण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार प्रवीण पांडे यांनी जंतुनाशक मार्गातून प्रवेश करतांना हाताने बटन न दाबता पायाने बटन दाबून जंतुनाशक मार्ग तयार करण्याची संकल्पना सोयगावच्या इंद्रसिंह खस यांना सांगितल्यावरून गुरुनानक वर्क शॉपचे इंद्रसिंह खस यांनी त्यांच्या कल्पकतेतून या मार्ग बनवून तहसील कार्यालयात बसविला.या जंतुनाशक मार्गातून प्रवेश करतांना त्याचेवर पाय ठेवल्यास अंगावर सॅनिटायझरचे फवारे उडून येणाऱ्या बव तहसील कार्यालयातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होते त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तहसील कार्यालयात प्रवेश करणारा प्रत्येक व्यक्ती निर्जंतुकीकरण होवूनच प्रवेश करतो.

सोयगावचे रॅचो इंद्रसिंग खस यांनी कल्पकतेतून हा जंतुनाशक मार्ग बनविला आहे.त्यामुळे जिह्यात शासकीय कार्यालयात या जंतुनाशक मार्गाची मागणी वाढली आहे.