माठाला आकार देणाऱ्या कुंभाराचे आयुष्य कोरोनाने बिघडवलं, बाजारपेठा बंद, लाखोंचं नुकसान, शासनाने मदत करावी―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―कडाक्याच्या उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असणाऱ्या माठांना बाजारपेठा बंद असल्यामूळे मागणी असुनही जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणुच्या संसर्ग होऊ नये म्हणून घेतलेल्या परवाना सारख्या जाचक अटी आणि ग्रामिण भागातील आठवडे बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका बसला असून शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, बीड तालुक्यातील मौजे बोरखेड येथिल कुंभार महादेव बापुराव बोराटे आपल्या दोन मुले आणि सूनासह पारंपरिक माठ ,रांजण , विविध देवदेवतांच्या मूर्ती बनवण्याचा लघुउद्योग करतात.परंतू यावर्षी कोरोनाने आठवडे बाजार शासनाने बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे.

महादेव बापूराव बोराटे : “दरवर्षी प्रमाणे २००० माठ उन्हाळ्यापुर्वी तयार करून ठेवले आहेत.दरवरषीं २ लाख रु चां धंदा होतो यावर्षी शासनाने आठवडे बाजार कोरोना मुळे बंद ठेवल्यामुळे २००० रु ची सुद्धा विक्री झाली नाही. अल्प भुधारक शेतकरी असुन केवळ २ एकर शेती आहे त्यात कापूस लावला होता परंतु यावर्षी त्यानेही साथ दिली नाही.”

मारोती महादेव बोराटे : “आम्ही लिंबागणेश , चौसाळा , पाटोदा येथिल आठवडे बाजारात प्रत्येकी १५० रु नग प्रमाणे २० लिटर पाणी क्षमता असणारा गरीबांचा फ्रिज म्हणुन ओळखला जाणारा माठ विकला जातो.त्यासाठी यावर्षी अडीच लाख रू खर्च करुन हफ्त्याने छोटा हत्ती घेतला.परंतु कोरोनाने आठवडे बाजार बंद असल्यामुळे गाडीचे हफ्ते भरणे बंद झाले आहे.”

सिता मारोती बोराटे : “देवदेवतांच्या मूर्ती तयार करणे आमचा पारंपरिक व्यवसाय असुन नगर वरुन कच्चा माल मागवण्यात येतो , गणपती ,लक्ष्मी आदि.सणासुदिच्या काळात लागणा-या मुर्ति बनवल्या जातात.आठवडे बाजार आणि यात्रेत मोठ्या प्रमाणावर विक्री होत असे परंतु यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठा बंद ठेवल्यामुळे मोठ्या मुर्ति बनवणे बंद केले आहे.दरवर्षी दिडलाखाचे उत्पन्न मिळायचं . यावर्षी कोरोना मुळे नफा दूरच साधा खर्च सुद्धा निघणं अवघड झालंय.”

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर : मा.राहुलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड आणि मा.अजितजी कुंभार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी ग्रामिण भागातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने तसेच शेतकऱ्यांना भाजीपाला/फळे ,व ईतर लघु उद्योग धंदे करणारांना कृषि विभाग आणि पणन विभागा मार्फत परवाने मिळवण्याची जाचक अटी रद्द करण्यात याव्यात कारण ९० टक्के परवाने शेती व्यवसाय न करणा-या बागवान समाजाकडे असून यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांचे नुकसान असुन केवळ मध्यस्थ, दलाल यांचाच फायदा होतो.तसेच ग्राहक केंद्र , कीराणा दुकाने याठिकाणी होणारी गर्दी पाहता शेतकरी सामाजिक अंतर राखुन भाजीपाला, फळे व ईतर वस्तुंची विक्री करतात त्यामुळे जिल्हाप्रशासनाने परवाना जाचक अटी रद्द करण्यात याव्यात आणि आठवडे बाजारास परवानगी द्यावी अशी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री , कृषिमंत्री, ग्रामविकास मंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना केली आहे.