औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजशेतीविषयकसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात लॉकडाऊनवर कोणताही फरक नाही ,परिस्थिती जैसे थे ,शेती कामे सुरु

जरंडी,ता.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन बाबत शासनाची मोठी घोषणा होणार असल्याच्या अफवांना अखेर सोमवारी चपराक बसला असून लॉकडाऊनमध्ये सोयगाव तालुक्यात परिस्थिती जैसे थे असून फक्त हातावर पोट असलेल्या मजुरांना शेती कामांसाठी सुत मिळालेली असल्याने शेती शिवारात महिनाभराच्या कालावधी नंतर मजूर कामावर गेल्याचे बदल आढळून आला होता.मजुरांनीही शेती कामावर सामाजिक अंतराचा नियम पाळून काम केले आहे.
२० एप्रिलनंतर लॉकडाऊनच्या नियमात बदल होईल अशा वावड्या तीन दिवसापासून उडाल्या होत्या,परंतु या शिथिल करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सोयगाव तालुक्यात कोणताही बदल झालेला दिसून आलेला नसल्याने लॉकडाऊनची परिस्थिती जैसे थे होती.लॉकडाऊन मध्ये शेती कामांना सुत देण्यात आल्याने महिनाभरानंतर सोमवारी हातावर पोट असलेल्या मजुरांनी शेती कामावर हजेरी लावल्याचे आढळून आले.सोयगाव तालुकात लॉक डाऊन मध्ये रब्बी पिकांच्या कापण्या,काढणी तसेच आगामी खरिपाच्या हंगामाची पूर्वतयारी रखडली होती,परंतु लॉकडाऊनच्या नवीन बदलात शेती कामांना सुत मिळाल्याने शेतावर मजुरांनी सामाजिक अंतराचे नियम पाळून खरीप हंगामाची पूर्वतयारीचे कामे हाती घेतल्याचे आढळून आले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    महिनाभरानंतर शेती शिवारे गजबजली-

    तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर सोयगाव तालुक्यातील शेती शिवारे गजबजून दिसून आली परंतु त्यामध्येही मजुरांनी सामाजिक अंतराचे भान ठेवत कामे हाती घेतली होती.

    दुपारच्या न्याहारीला सामाजिक अंतर-

    शेती कामे करतांना शेतीच्या कामांसोबतच दुपारची न्याहारी करतांनाही मजुरांनी झाडाच्या सावलीखाली सामाजिक अंतराचा नियम पाळून दुपारची भाकरी खाल्ली व पाणी पितांनाही स्वतारंत ग्लास ठेवत मजुरांनी पहिल्याच दिवशी शेतावरही आरोग्याची काळजी घेतल्याचे आढळून आले होते.