सोयगाव:ठिबक सिंचनवर उन्हाळी तीळ ,चटकदार उन्हात बहारदार तीळ

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शेतीच्या उत्पन्नात वाढीसाठी सोयगाव तालुक्यात हातावर आलेल्या शेतकऱ्यांनी बारमाही शेतीचा उपक्रम खंडित न होवू देता यंदाच्या वर्षी ठिबक सिंचनवर उन्हाळी तीळ लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे.जानेवारी महिन्यात लागवड केलेल्या या उन्हाळी तीळ पिकांना मात्र चटकदार उन्हात फुलोऱ्यावर आली आहे.त्यामुळे सोयगाव भागात उन्हाळ्यातही हिरवळ तयार झाली आहे.
शेततळ्याच्या पाण्यावर ठिबक सिंचनवर या तीळ पिकांचे संगोपन करण्याचा प्रयोग शेतकऱ्यांनी हाती घेतला आहे.आणि सदरील प्रयोग यशस्वीही झाला असल्याचे एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात आढळून आले आहे.खरीप आणि रब्बीच्या पिकांचे नैसर्गिक संकटात झालेल्या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी शासनावर विसंबून न राहता प्रायोगिक शेतीकडे शेताकायांचा कल दिसून आला आहे.कोणत्याही पुस्तकीय ज्ञानाखेरीज केवळ अनुभवाच्या जोरावर सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी विविध पिकांचे लागवडी प्रयोग हाती घेतले आहे.सध्या तर शेततळ्याच्या पाण्यावर ठिबक सिंचनची जोड देवून चक्क उन्हाळी तीळ लागवडीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात उन्हाळ्यातही तीळची चटणी खाण्यास मिळणार आहे.

माळरानावर बहरली तीळ-

माळरानावर ठिबक सिंचनच्या द्वारे या उन्हाळी तीळची लागवड करण्यात आली आहे.पन्नास हेक्टरवरील क्षेत्र तीळ पिकांनी बहरलेले असून सध्या या तीळ पिकांचे फुलोरा गळण्याच्या मार्गावर असून फुलोरा गळण झाल्यावर तीळ पिके पक्के होतील असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कडाक्याच्या उन्हात पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी या उन्हाळी तीळ पिकांचे जतन केले असल्याने सोयगाव परिसरात उन्हाळी तीळचे मोठे उत्पन्न हाती येईल,परंतु ऐन उत्पन्नाच्या काळात कोरोना संसर्गाचा लॉकडाऊन सतत राहिल्यास मात्र या नवीन तीळ विक्रीचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.