कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युज

सरपंचाच्या आडमुठेपणा मुळे महाजनवाडीकरांच्या घशाला कोरड ,पाणी पुरवठा विहीरीवरील स्टाट्रर ,फ्युज सुद्धा गायब ―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेणारे प्रसंगी स्वत: बोअरवेल घेऊन गावाला पाणी पाजणारे आपण पाहीले परंतु केवळ गावाला वेठीस धरण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध असुनही गावाला तहानलेलेच ठेवण्यात समाधान मानणारे महाजन वाडी गावचे आडमुठे सरपंच निराळेच.यासंबधी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री , पाणीपुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बीड तालुक्यातील मौजे महाजनवाडी हे २५०० हजार लोकसंख्या असणारे गावामधे मतदान १३५० , राष्ट्रीय महामार्ग ५६ मांजरसुंभा ते पाटोदा पासून ३ कि.मी.अंतरावर.
गावांसाठी ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत एकुण ४ सार्वजनिक विहीरी आहेत.तर यापैकी आजमितीला ३ विहीरीमधे पाणी २ परस आहे.तसेच येथुन गावात पाईपलाईन आहे.परंतु केवळ आडमुठेपणा करण्यात तरबेज असणारे सरपंच विहीरीला पाणी नाही.म्हणतात, तसेच टंकरची मागणी सुद्धा करत नाहीत.

Png;base64,iVBORw0KGgoAAAANSUhEUgAAAYYAAADcAQMAAABOLJSDAAAAA1BMVEUAAACnej3aAAAAAXRSTlMAQObYZgAAACJJREFUaIHtwTEBAAAAwqD1T20ND6AAAAAAAAAAAAAA4N8AKvgAAUFIrrEAAAAASUVORK5CYII=

रविंद्र तुरुकमारे गटविकास अधिकारी पं.स.बीड यांची दिशाभुल

४ दीवसापुर्वी दलित वस्ती मधिल महिलांनी सरप़च गणेश बाबासाहेब हिंदोळे यांच्याकडे विचारणा केली असता डॉ.गणेश‌ ढवळे लिंबागणेशकर यांच्या दारात उभे राहून पाणी चर्या असे सूनावले . महिला हंडे घेऊन लिंबागणेश येथे आलेल्या मी त्यांनी पाणीही दिले, यावेळी गटविकास अधिकारी पं.स.बीड यांना विचारणा केली असता दोन दीवसात बोअरवेल घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणाले.त्यानंतर २ दिवसांनीं बोअर घेतला.परंतु विहिरीत पाणी टाकण्यासाठी पाईपलाईन जोडलीच नाही.

ग्रामिण पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीचे स्टाटर आणि फ्यूज सूद्धा गायब

ज्या सार्वजनिक विहीरीत ग्रामिण पाणीपुरवठा योजनेच्या आहेत त्या विहीरी शेजारी असणा-या विद्यूत डीपी मंदिर स्टाटर आणि फ्यूज सूद्धा सरपंचांनी गायब केले असून सरपंचाला गावाला पाणी देण्याची ईच्छाच नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नवनाथ बोराडे: दलित वस्ती मधिल महिलांनी सरपंचांना पिण्याच्या पाण्याविषयी विचारणा केली असता . अगोदर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या दारात उभे राहून पाणी मागा असे उद्दामपणे सांगितले. त्यानंतर जो कोणी पाण्याची मागणी करेल त्यांच्या निराधारांच्या पगारी बंद करू अशी धमकी दिली जाते. संबंधित प्रकरणी जिल्हाधिकारी बीड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी तक्रार दाखल केली आहे.


Back to top button