गरीब माणूस उपाशी झोपणार नाही,याची काळजी घेणार–जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख ; अंबाजोगाईत शिवभोजन केंद्राची सुरूवात

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात शासकीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे उदघाटन बीड जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.उद्घाटक म्हणून बोलताना आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील गरीब व गरजू माणसांपर्यंत शासकीय योजना आणि यंञणा प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न करीत आहोत.शक्य तिथे गरजूंना वैयक्तिकरीत्या ही मदत करीत आहे.गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी घेणार असल्याचे जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले.

शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात शनिवार,दिनांक 18 एप्रिल रोजी शासकीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असुन त्याचे उदघाटन बीड जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदराव देशमुख,तहसिलदार संतोष रूईकर,मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव सिरसाट,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे,यशवंतराव चव्हाण चौक येथील शिवभोजन केंद्राचे संचालक काकासाहेब जामदार आणि योगेश देशमुख यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की,कोरोनाच्या संकट काळात गरजुंना शासकीय शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या महाविकास आघाडीची महात्वाकांक्षी शिवभोजन योजना यापुर्वी फक्त जिल्हा स्तरांवर होती.मात्र कोरोनाच्या या संकटात गोरगरीब व गरजूंना दिलासा देण्यासाठी तालुका स्तरांवर ही योजना आता राबविण्यात येत आहे.त्यानुसार तहसिलदार, मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने शहरात यशवंतराव चव्हाण चौक,सदर बाजार चौक व रिलायन्स पेट्रोल पंपासमोर शिवभोजन केंद्र नियुक्त केले आहेत.त्यापैकी यशवंतराव चव्हाण चौक येथील काकासाहेब जामदार आणि योगेश देशमुख यांना केंद्र सुरू करण्यास परवानगी मिळाली.या केंद्राचे आज उद्घाटन झाले आहे.लॉकडाऊन काळात परस्थितीने गांजून गेलेले लोक,हातावर पोट असलेले विविध समाज घटक यांना मोफत भोजन वितरण करण्यात येत आहे.या भोजन व्यवस्थेवर व्यक्तीश: लक्ष ठेवून आहोत.काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेऊत.अंबाजोगाईत शिवभोजन मोफत योजना हा उपक्रम अतिशय चांगला व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे असे सांगून शहरात शिवभोजन केंद्र सुरू झाल्याने अनेक गरजुंना आधार मिळणार असून जनसामान्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे.

200 लोकांच्या मोफत भोजनाचे दिले पैसे

कोरोना संकटकाळात लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने समाजातील वंचित,गरीब,गरजूंना किमान मोफत भोजन मिळावे या विधायक भूमिकेतून बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट व जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी प्रत्येकी 100 लोकांचे असे एकूण 200 शिवभोजन थाळीचे पैसे देवून शिवभोजन मोफत भोजन उपक्रमास माणुसकीच्या नात्याने मदत केली.