बीड:आठवडा विशेष टीम―बीड शहरापासून जवळच असणार्या जिरेवाडी येथील कै.भागवत चाळक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित चाळक परिवाराच्या वतीने गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले याबाबत अधिक माहीती अशी कि जिरेवाडी येथील कै.भागवत चाळक यांची प्रथम पुण्यतिथी दि,20/04/2020 रोजी होती यावर्षी कोरोनो या भंयकर महामारीने जगभरात थैमान घातले आहे आणि त्यात लाँकडाऊन मुळे हाताला काम नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली यासर्व गोष्टीचा विचार करत व गरिबी या काय असते याची जाणिव ठेवून हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुध्दा जिरेवाडी येथील उर्मिला भागवत चाळक निलेश भागवत चाळक,महेश भागवत चाळक,योगेश भागवत चाळक यांच्या वतीने कै,भागवत चाळक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित जिरेवाडी येथे गरजू नागरिकांना धान्याचे वाटप करण्यात आले व तसेच वासनवाडी परिसरातील पारधीवस्तीवर ही धान्य वाटप करण्यात आले यावेळी डिंगाबर मोहीते विनोद मोहीते,गोकूळ मोहीते गणेश मुळे,ऋषीकेश मोहीते यांनी ही सहकार्य केले