भाजीमंडीतील विक्रेत्यांना मिळेना फळे व भाजीपाला विक्रीची परवानगी ;शेतकरी व विक्रेत्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आला.3 एप्रिल पासून अंबाजोगाईत भाजीमंडी बंद आहे.यामुळे
छोटे शेतकरी,होलसेल विक्रेते आणि भाजीपाला व फळे विक्री करणारे 450 हातगाडीवाले यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.भाजीपाला व फळे हे नाशवंत आहेत.नुकसान झाले तर विमा संरक्षण नाही.त्यामुळे या लाखो रूपयांच्या नुकसानीची भरपाई कशी होणार हाच मोठा प्रश्न आहे.म्हणून जिल्हाधिकारी यांनी अंबाजोगाईत फळे व भाजीपाला विक्रीची परवानगी अशी मागणी फळे व भाजीपाला उत्पादक छोटे शेतकरी आणि भाजीमंडीतील विक्रेत्यांकडून होत आहे.

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार येथील छोटे शेतकरी आणि भाजीमंडीतील विक्रेत्यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना आपली व्यथा आणि प्रश्न मांडले.ते म्हणाले की,अंबाजोगाई येथील भाजीमंडी ही बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाची आहे.छोटे शेतकरी यांना ती उपयुक्त आहे.या मंडीत सफरचंद,द्राक्षे,चिकू,संञी, मोसंबी,केळी,टरबूज, खरबुज,आंबा,पपई,किवी,ड्रॅगन फ्रुट,अननस,स्ट्रॉबेरी, अंजीर,नारळ आदी विविध फळे देशाच्या व राज्याच्या अनेक भागांतून अंबाजोगाईतील होलसेल विक्रेत्यांमार्फत छोट्या हातगाडीवरून शहरातील नागरिकांच्या घरी माफक दरात उपलब्ध करून दिला जातो.त्याच प्रमाणे कांदा, लसूण,वांगे,कारले,बटाटा, मेथी,शेपू,वाटाणा,सिमला मिरची,अद्रक,दोडका,गवार, शेवगा शेंग,बीट,लिंबू, काकडी,चवळी या पालेभाज्या राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून विक्रीसाठी अंबाजोगाई शहरात हातगाडीवरून आणि होलसेल विक्रेत्यांमार्फत गल्लोगल्ली
सहज विक्री होतात. भाजीमंडीवर शेकडो कुटुंबे आणि हजारो छोट्या शेतक-यांची उपजिविका अवलंबून आहे.कोरोना संसर्गजन्य साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आला.अत्यावश्यक सेवा म्हणून फळे व भाजीपाला
यांचा समावेश करण्यात आला.परंतु,बीड जिल्हा प्रशासनाचे धोरण हे होलसेल फळ व भाजीपाला
विक्रेते आणि छोट्या शेतक-यांवर आणि सर्वसामान्य जनतेवर थेट परीणाम करणारे आहे. त्यामुळे सदरील धोरणांत व नियमांत बदल करून अंबाजोगाईतील भाजीमंडी मार्फत हातगाडीवरून थेट गल्लीबोळातून भाजीपाला व फळे पुरवठा करण्यात यावा.जिल्हाधिकारी,बीड यांनी ठरवून दिलेली नियमावली ही अत्यंत जाचक आहे.भाजीपाला व फळे विक्री बाबतच्या धोरणांमुळे अंबाजोगाई शहरात फळे व भाजीपाला
यांचा तुडवडा निर्माण झाला आहे.यामुळे छोटे शेतकरी व होलसेल,सामान्य विक्रेते यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे व आज ही होतच आहे.म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद,नांदेड,परभणी व लातूर जिल्ह्याच्या धर्तीवर वितरण व्यवस्था सुधारीत व सुरळीत करावी आणि अंबाजोगाईतील भाजी मंडी तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली.

450 हातगाडी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ

अंबाजोगाई शहरात हातगाडीवरून फळे व भाजीपाला विक्री करणारे 450 हातगाडी विक्रेत्यांवर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या धोरणांमुळे उपासमारीची वेळ आली आहे.तरी जिल्हाधिकारी यांनी याप्रश्नी सहानुभूतीपुर्वक विचार करावा,नियमांत सुधारणा करून न्याय द्यावा.

―अॅड.इस्माईल गवळी,(प्रतिनिधी,हातगाडी विक्रेता.)

फळ विक्रेत्यांचे लाखो रूपयांचे नुकसान…

भाजी मंडीत सफरचंद, द्राक्षे,चिकू,संञी,मोसंबी, केळी,टरबूज,खरबुज, आंबा,पपई,किवी,ड्रॅगन फ्रुट,अननस,स्ट्रॉबेरी,अंजीर ही फळे अॅडव्हान्स पेमेंट देवून खरेदी करणारे व्यापारी यांचे तसेच छोटे शेतकरी यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.तेव्हा जिल्हा प्रशासनाने विक्रीस परवानगी द्यावी.सोशल डिस्टन्स पाळून,मास्क वापरून छोटे शेतकरी व होलसेल,सामान्य विक्रेते थेट विक्री करतील व त्यांचे होणारे नुकसान थांबेल. ―शेख अन्वर शेख वली हसन(होलसेल फळ विक्रेता.)

शेती करू का,भाजीपाला विकू..?

भाजीपाला हा नाशवंत आहे.जेवढा भाजीपाला तयार होतो.तेवढा विक्री होत नाही.दिवसभर बसून किंवा फिरून विक्री शक्य नाही.कारण,शेती ही मीच करायची व भाजीपाला ही मीच विकायचा ही तारेवरची कसरत आहे.त्यामुळे मा.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार छोट्या शेतक-यांना भाजीपाला व फळे हातगाडीवरून शहरातील गल्लीबोळातून विकण्याची मुभा द्यावी. ―दत्ताञय निवृत्ती घोडके,(शेतकरी,अंबाजोगाई.)