अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19क्राईमबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

संचारबंदी काळात सिरसाळा येथील पोलीसांना झालेल्या मारहाणीतील आरोपींना जामिन मंजुर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― संचारबंदी काळात सिरसाळा (ता.परळी) येथे बुधवार,दि.25 मार्च 2020 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पो.नाईक किशोर कचरू घटमाळ व पो. नाईक जेटेवाड हे कोरोना संचारबंदीचे काळात वडार गल्ली सिरसाळा येथे गेले असता तुकाराम बाबु पवार यांचे घरासमोर पुरूष व महिलांची गर्दी जमलेमुळे त्यांना घरात बसा व संचारबंदीचे नियम पाळा असे पो.ना.घटमळ यांनी राम तुकाराम पवार व इतरांना सांगत असताना अचानक 1) राम तुकाराम पवार,2) श्रीराम बाबु पवार, 3) अशोक तुकाराम पवार, 4) विकास अर्जुन मिटकर, 5) राजु राम लष्करे, 6) विशाल मिटकर, 7) सोनाली राम पवार, 8) सोजरबाई तुकाराम पवार, 9) पप्पु श्रीराम पवार यांनी व इतर 3 जणांनी पोलीस नाईक घटमल व जेटेवाड यांना लाकडाने,विटाने व दगडाने मारहाण केली.त्यात पोलीस ना.घटमल व जेटेवाड हे गंभीर जखमी झाले अशी फिर्याद पो.स्टे. सिरसाळा यांनी बुधवार,दि. 25/03/2020 ला दिल्यावरून त्याची नोंद फा.क्र.63/2020 प्रमाणे गुन्हा कलम 353,307, 332,336,143,147, 149,323,504,506, 188,आय.पी.सी.व कलम 51 (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे नोंद झाला.वरील आरोपींना 25/10/2020 रोजी सुमारे 10 वाजता अटक केली.परळी न्यायालयाने त्यांना दिनांक 26/03/2020 ते 06/04/2020 पर्यंत पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर 16/04/2020 पर्यंत व पुढे न्यायालय कोठडी दिली आहे.वरील सर्व आरोपींविरुध्द पोलीस सिरसाळा यांनी खोटा गुन्हा दाखल केला.सकृत व प्रथम दर्शनी आरोपींविरूद्ध दाखल केलेला आरोप चुकीचा आहे.वैद्यकीय अहवालही संशयास्पद आहे.उलट आरोपीस पोलीसांनी मारहाण केलेच आरोपीचे म्हणणे आहे. आरोपीनी गुन्हा केला नाही. इत्यादी प्रकारची ठोस बाजुचा मे.जिल्हा व सत्र न्यायालयासमोर युक्तीवाद करून पोलिसांनीे सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद आहेत.आरोपींना जामिनवर सोडण्याची मागणी अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके यांनी केली.असता मे.सत्र न्यायालयाने वरील सर्व आरोपींना 15 हजार रूपयांचे जामीनवर मुक्त करण्याचे आदेश देवून सर्वांनी दर सोमवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत पो.स्टे.सिरसाळा येथे हजेरी लावणेचा आदेश ही दिला आहे.
संचारबंदी व कोरोना परिस्थितीतील सदरील घटना ग्रामीण भागातील असलेमुळे त्यावेळी राज्यभर दुरदर्शनवर व वर्तमानपत्रात खुप गाजलेली आहे.सदर प्रकरणात आरोपींची बाजु अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके , अ‍ॅड.रणजित सोळंके, अ‍ॅड.एस.ए.पांचाळ, अ‍ॅड.रामेश्‍वर जाधव, अ‍ॅड.शिवराज साळुंके यांनी पाहिली आहे.