कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

बीड: कोरोनाच्या भीषण संकटात पाटोदाकरांना तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांच्या रुपाने राष्ट्रीय काँग्रेसचा मदतीचा हात

पाटोदा:गणेश शेवाळे― कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डॉऊन मुळे गोरगरीब जनतेला उपासमारीची वेळ आलेली असून यामुळे अनेक लोक संकटात सापडले असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मदत नव्हे कर्तव्य म्हणून पाटोदा राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब कुटुंबाना तुम्ही संकटात एकटे नाही राष्ट्रीय कॉग्रेस तुमच्या सोबत असून कोरोनाच्या भीषण संकटात पाटोदा राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचा मदतीचा हात म्हणून राष्ट्रीय कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून देशाचे नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली व माझी खासदार रजणीताई पाटील,आशोकराव पाटील तसेच कॉग्रेस नेते जुबेरभाई चाऊस यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये आलेला सर्व गहू गोरगरीब कुटुबांना मदतीचा हात म्हणून मोफत वाटला यावेळी युवानेते उमर चाऊस,इमरानभाई शेख,राहुल बामदळे,युवराज जाधव,गोविंद बामदळे,आप्पा घुमरे,राहुल सोनवने,यांच्या सह इतर जन उपस्थित होते तसेच आपल्या शेतातील सर्व गहू अडचणीत सापडलेल्या गोरगरीब कुटूंबाना वाटून कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी एक चांगला सामाजिक संदेश समाजात दिला असला तरी माञ कोरोनाच्या भीषण संकटात पाटोदेकराना राष्ट्रीय कॉग्रेसचा मदतीचा पका हात मिळाला.

Back to top button