ऊसतोड कामगारकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

ऊसतोड मजुरांसाठी दिलेला निधीचा योग्य वापर आणि तलाठी ,ग्रामसेवक मुख्यालयी रहात नसतील तर लेखी तक्रार करा― डॉ.गणेश ढवळे

बीड दि.२१:आठवडा विशेष टीम―ऊसतोड मजूर गावी परतले असुन त्यांची काळजी घेण्यासाठी मा.राहुलजी रेखावार साहेब यांनी तलाठी, ग्रामसेवक यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असुन १४ वर्मा वित्त आयोगाच्या आरोग्य विषयक योजनेतून कोरोनाच्या संकटकाळी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे ,तो योग्य मार्गाने खर्च होत आहे का??यांची काळजी दक्ष नागरिकांनी घ्यावी आणि काही काळंबेरं असल्यास जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार करावी असे आवाहन ग्रामस्थांना करत आहे.

ऊसतोड मजुरांची व्यथा :
आम्ही अंजनवतीकर एकुण २६ माणसं ,त्यात १२ महिला , ११ पुरूष आणि ३ लहान मुले असे सोनहिरा जि.सांगली या कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होतो, कोरोना आजारामुळे आम्हाला दि. ८ एप्रिल पासुन ऊसतोडणी काम बंद करण्यात आले.

कारखान्याने माणसं आणि जनावरांच्या खाण्याची सोय लावली :

जनावरांना खाद्य प्रति जनावर १५ किलो अखंड वाहड्यासकट ऊस आणि माणसांसाठी कीराणा सामान दि. ७ एप्रिल रोजी पुढीलप्रमाणे देण्यात आला
एक गाडी टायर साठी ५ किलो गहु ,५ किलो तांदुळ २ किलो तुरडाळ ,तेलपुडा १ कीलो. ,दुसरी वाटप १७ तारखेला झाली त्यामधे मात्र राशन कमी देण्यात आले
५ कीलो गहु , २ कीलो तांदूळ , आणि २ किलो साखर , १ किलो तेल , तूरदाळ १ कीलो देण्यात आली.

गावी परतण्याची अनिश्चितता , पावसाने झोडपले , लोकांचा संयम सुटला ,मग परवानगी मिळाली :

आमची मागणी होती आम्हाला गावी पोहचवा ,कारखान्याचे चेअरमन म्हणायचे आमच्या हातात काही नाही.शासन निर्णयाप्रमाणे आम्ही वागतो, आम्हाला लेखी आदेश जिल्हाधिकारी यांचा आल्यानंतर तुम्हाला घरी पाठवण्याची व्यवस्था करू.आम्ही घरी जाण्यासाठी आडून बसलो ४-५ दिवसांपूर्वी राहण्याच्या कोप्या काढल्या होत्या.अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस आला, अंगावरील कपड्यासकट भिजलो ,धान्य सुद्धा भिजले. मग आमचा संयम सुटला आणि चेअरमन बरोबर आमची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दि. १९ एप्रिल रोजी रात्री तहसीलदार यांनी कारखान्यावर येऊन सांगितले तुम्हाला ऊद्या सकाळी सोडण्याची लेखी परवानगी जिल्हाधिकारी सांगली यांनी दिली आहे.त्यानंतर अंजनवती येथिल सखाराम तुकाराम मोरे यांच्या १२ टायर ट्रकने काल रात्री प्रवास सुरू केला . सगळ्या वैद्यकीय तपासण्या कारखान्यावर झालेल्या होत्या तरीसुद्धा आज पारगाव-चौसाळा पोस्ट वर पुन्हा वैद्यकीय तपासणी केली.

गावाबाहेर होम क्वारंटाईन केले , सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , पोलिस येऊन गेले , तलाठी आलाच नाही :

आज मंगळवार रोजी दुपारी १ वा.गावशिवारात आलो होतो,तेव्हा सरपंच सूनिल दादाराव येडे , उपसरपंच ज्ञानोबा बंकट येडे , ग्रामसेवक हावळे , सुनिल येडे , फुलचंद येडे , अर्जून शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार गावठाणाबाहेर राहण्याची सोय केली. सर्व व्यवस्था करतो म्हणाले परंतु ५ वाजले अजुनही जनावरांच्या चारा ,आमची खाण्याची सोय अजुन झाली नाही, सरपंच , ग्रामसेवक लवकरच भाजीपाला, कीराणा सामान आणि जनावरांना चारा आणतो म्हणाले.

लिंबागणेश पोलिस चौकीचे जमादार वाघमारे जी.बी. येऊन गेले , याठिकाणाहून कोठेही जाऊ नका , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी तुमची सर्व सोय बघतील.काही अडचण आली तर मला फोन करा म्हणून फोन नंबर देऊन गेले.

सुनिल दादाराव येडे :

सरपंच अंजनवती
यांना सर्व प्रकारच्या जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, कुठल्याही प्रकारची कसर राहणार नाही.याची मी जबाबदारी घेतो.

हावळे ग्रामसेवक, अंजनवती :

त्यांना आठ दिवस पुरेल इतकं पीठ , भाजीपाला , तेल ,मीठ , किराणा सामान अगदी काड्यापेटीसकट दिले आहे. आपल्या हस्तेच वितरण करा. नियमित यांना असूविधा होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते:

शासनाने ग्रामपंचायतींना चौदावा वित्त आयोग आरोग्य विषयक योजनेतून कोरोनाच्या संकटकाळी जनजागृती व गावांमध्ये सनेटायझर वाटप , मास्क ,धुरफवारणी , औषधफवारणी, रस्ते स्वच्छता, नाली स्वच्छता, पाणीपुरवठा या उपाय योजना करण्यासाठी पंचायत समिती मार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचा निधी मंजूर केला असुन खर्च करण्याची परवानगी दिली आहे.तरी ग्रामपंचायत या निधीचा योग्य ठिकाणी वापर करीत आहे का तसेच हा निधी काहीही न करता सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार, सामाजिक संस्था यांनी केलेली कामे स्वत: केल्याचे दाखवून निधि हडप करते यावर दक्ष नागरिक म्हणून लक्ष ठेवणे आवश्यक आहे,तसेच काही अपहार वापरल्यास पुराव्यासह संबंधितांवर जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात यावी असे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ग्रामस्थांना करत आहेत.

Back to top button