अहमदनगर जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19जामखेड तालुकाब्रेकिंग न्युज

#Covid19 जामखेडमधून कोरोना बाधिताच्या संपर्कातील एका नगरसेवकासह २५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

जामखेड:आठवडा विशेष टीम―जामखेड येथील वध्द व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर केलेल्या कोरोना तपासणीत ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपर्कातील ९ व्यक्तींच्या तपासणीतून मृत व्यक्तीच्या कुटुंबातील दोन जण कोरोना बाधित असल्याचे पुण्याच्या सैनिकी महाविद्यालयाच्या अहवालात दि २० रोजी स्पष्ट झाले. तर एका डॉक्टरासह चार जणांचे रिपोर्ट निगेटीव आले आहेत. प्रशासनाने त्या दोन जणांच्या संपर्कात आलेल्या शहरातील एका नगरसेवकासह १८ जणांना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले होते एकूण २५ जणांची कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ यूवराज खराडे यांनी सांगितले. जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला । आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या इतरांनीही स्वतः हुन तपासणीसाठी पूढे येण्याचे आवाहन शहरातील मौलाना, तहसिल व पोलिस प्रशासनाच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आले आहे. संपूर्ण जामखेड शहर हाँटस्पाँट आहे. कोरोना बाधितांचा तो भाग प्रशासनाने पुर्णत:सिल करुन नागरिकांना संचारबदी केली आहे. त्या भागातील सर्व नागरिकांनी पूर्णतः स्वतःला होम कोरॉन्टाईन केले आहे सर्व नियम पाळत प्रशासनास सहकार्य करत आहेत. शहरातील त्या भागात निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे. आशा सेविकांमार्फत पून्हा घरोघरी जाऊन सर्वेचे काम सुरू आहे.

Back to top button