७ वर्षापासुन बापाचा मुलीवर अत्याचार

बारामती:आठवडा विशेष टीम― वासनेपुढे अंध झालेल्या नराधमानं बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणार कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. बापाने पोटच्या मुलीवरच वारंवार बलात्कार केल्याची घटना बारामती शहरात ही घटना घडली. याप्रकरणी बापाविरुद्ध गुन्हा दाखल करत बारामती शहर पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सातवीत शिकत होती. त्यावेळी तिचं वय १३ वर्ष होतं. पीडितेला मासिक पाळीदरम्यान त्रास होत होता. एक दिवस पीडितेची आई कामानिमित्त बाहेर गेलेली असताना बापानं मुलीला तुझ्या पोटात दुखतं, त्याच्यावर माझ्याकडे उपाय आहे, असं सांगितलं. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर नराधम बापाने मुलीलाच वासनेची शिकार वारंवार बलात्कार केला. २०१३ ते १९ मार्च २०२० या काळात पीडितेवर आरोपीनं सातत्यानं अत्याचार केले. पीडिता आणि तिची आई धुणीभांडी करून कुटंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर आरोपी घरीच असायचा. बापाकडून वारंवार होणाऱ्या शोषणाला कंटाळून पीडितेनं मंगळवारी बारामती शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. संवेदनशील घटना असल्याचं लक्षात येता शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास सध्या एपीआय अश्विनी शेंडगे करीत आहेत.