आष्टी तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

#CoronaVirus आष्टीतील 'त्या' रुग्णावर अहमदनगरमध्ये उपचार सुरु ,दुसऱ्या रिपोर्टकडे लक्ष ; उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येण्याची शक्यता

बीड:आठवडा विशेष टीम― राज्यात सर्वत्र कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी जिल्ह्यात मात्र अजुनपर्यंत एकही नविन कोरोना रूग्ण आढळलेला नाही. तसे पाहिले तर मुळ जिल्ह्यामध्ये कोरोना झिरोच आहे. एक रूग्ण सापडला तोही नगरमध्येच आणि त्याच्यावर उपचारही त्याचठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जिल्ह्यात एक रूग्ण असला तरी प्रत्यक्षात मात्र एकही रूग्ण नाही. दरम्यान आष्टीतील 'त्या' रूग्णावर नगरमध्येच उपचार सुरू असुन आता त्याच्या दुसऱ्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एक रूग्ण कोरोनाबाधीत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पहिला रूग्ण म्हणुन त्याचा उल्लेख होत असला तरी त्या व्यक्तीचे रिपोर्ट नगर येथुनच पुण्याला पाठवण्यात आले होते. त्याचठिकाणी तो पॉझिटिव्ह आढळुन आला होता. सध्या त्या रूग्णावर अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील रूग्ण आढळुन आज १४ दिवस झाले आहेतत्यामुळे आता त्याच्या दुसऱ्या रिपोर्टकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बाधित रूग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास बीड जिल्हा कोरोनामुक्त होणार आहेत्यामुळे या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    नगरमधील दोन कोरोनाग्रस्तांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बीडकरांच्या आशा पल्लवीत

    नगर येथील जिल्हा रूग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सोमवारी पाठवलेले १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधीत दोन रूग्णांचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बुथ हॉस्पीटलमधुन डिस्चार्ज दिला जाणार आहे. आष्टी (जि.बीड) येथील एका कोरोनाग्रस्तावर नगरच्याच रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन बाधित रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बीडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन 'त्या' रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास बीड जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो.