गाडी न मिळाल्याने ऊसतोड कामगारांचा बैलगाडीने प्रवास ; पाथर्डीजवळ वाहनाने उडवल्याने गेवराई येथील कामगार जखमी

पाथर्डी:आठवडा विशेष टीम―आठवडा गाव सोडून ऊसतोड साठी गेलेले मंजूर कोरोना मुळे ते कारखान्यात अडकुन पडले होते.साळवे पंढरीनाथ सर्जेराव वय (३४), रसुराबाद साळवे मनिषा पंढरीनाथ वय (३०) रसुराबाद,ढोणे ज्ञानेश्वर यादव वय (३०) कसरवाडी,ढोणे इंदुबाई ज्ञानेश्वर वय (२६ ) कसरवाडी,हे सर्व जन भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव ता.आंबेगाव जि.पुणे या कारखान्याला गेले होते.त्याना गावा कडे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची गाडी भेटली नाही गेले होते. त्याना गावा कडे येण्यासाठी मग ते त्याची असणारी बैलगाडी घेऊन निघाले त्यांचे तीन दिवस प्रवास सुरू होतो मग ते चौथ्या दिवशी पहाटे भुते टाकळी जवळ ता. पाथर्डी जि. अहमदनगर येथे एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिली ,त्यात त्याची बैलगाडी चकनाचूर झाली ,संसार उपयोगी वस्तू रस्त्यावरती विखुरला गेला ,ते सर्वजन जबर जखमी झाले. त्यांच्या कडे असणारे साहित्य रस्ता वर पडले त्याच्या कडे असणारे बैलजोडी ला खुप मार लागल्याने त्यांना चलता येत नाही. बैलगाडी चा चकनाचुर झाले. अंदाजे प्रती कुटुंब ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले.