बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

#CoronaVirus परळी: नाथ प्रतिष्ठानचा मदतयज्ञ अविरत सुरूच ; शहरासह ग्रामीण भागात ३० हजार कुटुंबांना वाटले जीवनावश्यक वस्तूंचे किट

परळी दि.२२:आठवडा विशेष टीम― सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान च्या वतीने परळी मतदारसंघात लोक डाउन च्या काळात सुरु असलेला मदतीचा यज्ञ घरोघरी पोहोचला असून शहर व ग्रामीण भागात आतापर्यंत जवळपास ३० हजार कुटुंबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या या लढ्यात नाथ प्रतिष्ठान बहुमोल योगदान देत आह. पहिल्या टप्प्यात परळी शहरातील हातावर पोट असलेल्या गरजु नागरिकांना प्रभागनिहाय यादी करून जीवनावश्यक साहित्याचे किट ज्या मध्ये तांदूळ डाळी साखर, तेल, मीठ, तिखट, हळद, चहापत्ती आदी सामुग्री असणारे साहित्य वाटप करण्यात आले.

दुसऱ्या टप्प्या मध्ये ग्रामीण भागामध्ये मागेल त्या घटकांपर्यंत नाथ प्रतिष्ठान सामुग्री वितरित करीत आहे. नाभिक समाजातील लॉकडाउन मुळे सलून बंद असल्यामुळे गरजूंना मदतकार्य देणे गरजेचे होते, त्याच प्रमाणे हातगाडा चालक, हातरीक्षाचालक, हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्यसेवक कंपाउंडर, स्वीपर तसेच इतर कर्मचारी वृन्द यांनाही किराणा किट देण्यात आले.

परळी शहराच्या लगतच्या वस्ती शाहूनगर, राहुल नगर, रामनगर, युसुफीया कॉलनी,बसवेश्वर कॉलनी, भिमनगर आदी भागात सुद्धा प्रत्येक घरोघरी वितरण करण्यात आलेले आहे. पुढील काळात मागेल त्याला मदत याप्रमाणे अविरत मदतकार्य सुरू आहे.

यासाठी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नाथ प्रतिष्ठान चे सचिव नितीन कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी मदत पोचवण्यासाठी नियोजन करत आहेत.

परळी बाहेरही मदतकार्य सुरूच!

मतदारसंघातील विविध ठिकाणी अडकलेल्या अनेकांनी फोनवरून व विविध माध्यमातून मदत मागीतल्यानंतर ना. मुंडेंनी विविध माध्यमातून पुणे, मुंबई इतकेच नव्हे तर इतर राज्यातही अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना विविध माध्यमातून ना. मुंडेंच्या वतीने गरजूंना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहेत.

पुणे शहरात मराठवाडा हॉटेल व पिंपरी चिंचवड अशा दोन ठिकाणी लॉकडाऊन मुळे अडकलेल्या २०० विद्यार्थ्यांसाठी नाथ प्रतिष्ठान व धनंजय मुंडे मित्र मंडळाच्या वतीने मोफत जेवणाचे डबे पुरवले जातात.