#CoronaVirus बीड: धारूरच्या महिलेचा अहवाल निगेटिव्ह

धारूर:आठवडा विशेष टीम― शहरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा होती. त्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरात काल एका महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची अफवा शहर व तालुक्यात झपाट्याने पसरली होती. संबंधित महिलेस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चेतन आदमाने यांनी अंबाजोगाई येथे पाठविले. यानंतर तिचा नमुना तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. या नमुन्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला असुन तो निगेटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत तालुक्यातून ६ संशयितांचे नमुने तपासले आहेत.