जळगाव : पित्याने दोन मुलींना ५० फुट विहीरीत ढकलुन संपविले

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पिंपळगाव हरे येथील पावनभुमितील विकास सुरेश ढाकरे(तेली) या नराधम बापास पत्नी आरती, तनुश्री,पायल व शिवन्या अशा तीन मुली असून पत्नी आरती ही सध्या गरोदर आहे, दिनांक २२ रोजी सकाळी सात वाजता मुलिंचे पोषण आहाराचे तांदुळ घेऊन येतो असे पत्नी सांगून गावाबाहेर निघाल्यानंतर काही अंतरावर जावून आपण शेळीला चारा घेऊन येवू असे मुलिंना सांगत विकास सुरेश ढाकरे हा गावाच्या एक किलोमीटर अंतरावर आल्यावर मागवून एक मोटारसायकल स्वारास मला व मुलिंना तुमच्या सोबत येवू द्या असे सांगून पून्हा एक किलोमीटर अंतर जावून मुलिंसह मोटरसायकल वरुन ऊतरून शिंदाड गावाकडील जवखेडी शिवारातील अडचणीच्या ठिकाणी जाऊन पोहचला, त्यांनतर चिंचपूरा तालुका पाचोरा येथील रहिवासी असलेल्या अरविंद केशवराव शिंदे यांचे विहीरी जवळ येवून चला मी तुम्हाला विहिरील कबूतरे दाखवितो असे सांगून प्रथम मोठी मुलगी तनुश्री वय १० वर्षे हिस व नंतर लहान मुलगी शिवन्या हिला विहिरीत ढकलले व स्वत: ही विहिरीत उडी मारली आणि लगेच पाईपाला धरुन वर चढला, दरम्यान बाहेर आल्या नंतर गावातीलच त्याचा मामा रतन तेली यास भ्रमणध्वनी करुन मी असे कृत्य केले असल्याची माहिती दिली,रतन तेली यांनी तातडीने पोलिसांना कळविल्याने सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र बागुल यांनी शिंदाड येथील पोलिस पाटील ऐश्र्वर्या श्रीकृष्ण पाटील यांना घटनास्थळी जाऊन खात्री करण्यास सांगितले, ऐश्वर्या पाटील यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली व स्वत: हा फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला पिंपळगाव हरे पोलीसांनी तातडीने संशंयीत आरोपी विकास ढाकरे यास ताब्यात घेतले, घटनेचा तपास पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे करीत आहेत,मयतांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी केले.

अप्पर पोलिस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक ठण मांडून

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार चंद्रकांत ब्राम्हणे,सचिन पवार सचिन वाघ, देवेंद्र दातिर, अजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी जावून भेट दिली तर अप्पर पोलिस अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक हे पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत, मयत तनुश्री व शिवन्या यांचे मृतदेह येथील यूवक कैलास मांडोळे या यूवकाने विहीर बाहेर काढले.