आ.उदयसिंग राजपुत यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप ; पोलीस व आरोग्य विभागाची केली प्रशांसा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगांव कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग राजपुत यांच्या हस्ते सोयगांव पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना फेस मास्क वाटप करण्यात आले व आमदार यांनी तात्काळ सोयगांव तहसील कार्यालयात जाऊन कोरोना विषाणू बाबत योग्य ते उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आले व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडुन धान्य पुरवठा सुरळीत पणे चालू आहेत का या विषयी आढवा बैठकीत घेण्यात आली यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, अविनाश बनसोड, सपकाळ, नगरपंचायतीची मुख्यधिकारी सचीन तामखडे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप मचे, रविंद्र काटोले, संतोष बोडखे, सुरेश फुसे,आदिसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.