अखेर पोखरी दलित वस्ती ऊसतोड मजुरांची भुक जियो-जिंदगीनेच भागवली ,भाकरी पुरवण्याची हमी विठ्ठल घरत यांनी दिली ―डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे पोखरी येथिल दलित वस्तितील ५० ऊसतोड मजुरांना सुविधा उपलब्ध करून देण्यास , सरपंच , ग्रामसेवक, तलाठी ,आशा व आरोग्य सेवक यांनी नाकारल्यानंतर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मदतीने जियो-जिंदगीचे विठ्ठल तात्या घरत , रामचंद्र शिंदे, खंडु सगळे यांनी भाकरी देऊन भविष्यात सुद्धा तुमची उपासमार होऊ देणार नाही अशी हमी दिल्याने ऊसतोड मजूर भावनिक झाले ,या जिल्हाप्रशासनापेक्षा साखर कारखानदार बरे होते निदान जनावरांना चारा आणि माणसांना नियमित राशन देत होते, आमच्याच गावात आम्ही परके झालो आहोत.

दिक्षा भोसले (ऊसतोड मजूर महिला ९ महिने गरोदर )

आम्ही परवा सायंकाळी गावात पोहोचलो त्यावेळी आशा व आरोग्य सेवक यांनी माझा फक्त फोटो काढून नेला.तपासले नाही , जिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार दररोज तपासणी सांगितली असताना सुद्धा आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुद्धा कोणी आले नाही, ग्रामसेवकाने शुद्ध पिण्याचे पाणी , शौचालय , विद्युत पुरवठा अशी कोणतीही सोय केली नाही. आज सकाळी सुद्धा लांबुनच पाहून गेले. ईथल्यापेक्षा साखर कारखाना बरा होता रोज डांक्टर तपासणी , आठवड्याला राशन गहु , तांदूळ, तेल ,तिखट ,मिठ ,अंगाची साबण ,कडीपेटी सकट देत होते.

विठ्ठल तात्या घरत (जियो-जिंदगी सदस्य )मो.नं. ८२०८११०९०३

आम्हाला वाटत होतं परगावचे मजुर ज्याचं इथं कोणी नाही तर यांना भाकरी द्यावी , गावातील ऊसतोड मजुरांचे नातेवाईक आणि गावातील लोक त्यांच्या जेवणाची सोय करतील परंतु वस्तुस्थिती खुपच भयानक असून यांच्या भाकरीची सूद्धा जबाबदारी आज पासून जियो-जिंदगी घेत आहे.

डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड :

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजयजी मुंडे यांनी ऊसतोड मजुरांचे पालकत्व स्विकारावे आणि बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या जेवणाची म्हणजेच कीराणा, राशन , भाजीपाला यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून अथवा ईतर निधितून तरतुद करावी.यासाठी मा.राहूलजी रेखावार साहेब जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री’ अन्न पुरवठा मंत्री , ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलव्दारे पाठवले आहे.