#CoronaVirus चढ्या दराने विक्री करणाऱ्या वर कठोर कारवाई करा – डॉ. संदीप घुगरे

औरंगाबाद:आठवडा विशेष टीम―लॉकडाऊन व संचारबंदीची संधी साधत काही किराणा दुकानदार जीवनावश्यक मालाची चढ्या दराने विक्री करीत आहे.यासंबंधी अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर काहींनी संताप व्यक्त केला.या कठीण प्रसंगी प्रशासनाने किराणा दुकानदारांची बैठक घेऊन सर्वसामान्य ग्राहकांची होणारी लूटमार थांबवावी अशी मागणी जन क्रांती संघ च्या वतीने करण्यात आली.
आज संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे .जवळपास महिन्याभरापासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे व संचारबंदी लागू करण्यात आली आहे याची संधी साधून काही किराणा दुकानदार चढ्या दराने माल विक्री करीत आहेत.सर्व किराणा दुकानात भावफलक दर्शनी भागेत लावणे बंधनकारक आहे मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून ग्राहकास हवी असलेली वस्तू न देता दुसऱ्या कंपनीची वस्तू दिलय जात आहे .
सर्वत्र लॉकडाऊन असल्याने किराणा वाहतूक भाड्यात वाढ झाल्याचे ,घाऊक व्यापारी वर्गाकडून दार वाढून येत असल्याचे तसेच मलाच तुटवडा असल्याचे कारणे देत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्यात येत आहे.
वास्तविक सहा महिने धान्य तुटवडा भासणार नाही असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहेत व काळाबाजार तसेच चढ्या दराने विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत .
येणाऱ्या काळात कोणी काळाबाजार करून व चढ्या दराने मालाची विक्री करीत असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित दुकानदारावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जन क्रांती संघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदीप घुगरे, युवा संघटक किरण लिंगायत, दादाराव नजन, शिवाजी नेमाने,कृष्णा तोतरे,दीपक महानवर,जन क्रांती संघ महिला संघटक लता गायकवाड, खटके,गणेश तोतरे,ओबीसी नेते विलास नांदरकर, आदींनी दिला आहे.