मुख्याधिकार्‍यांच्या निवासस्थानी ओली पार्टी ,आरोग्य निरीक्षक निलंबीत ; तिघांनाही अटक

पाचोरा दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― लॉकडाऊन असल्यामुळे जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी आहे. मात्र अशाही परिस्थीतीत मद्य आणून ते चक्क नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी नगरपरिषदेच्या आरोग्य निरीक्षकासह दोघांनी बुधवारी ओली पार्टी केली. यावेळी अचानक पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर ह्या त्यांच्या निवासस्थानी आल्या असत्या त्यांनी या तिघांना पार्टी करतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान याप्रकरणी आरोग्य निरीक्षकास निलंबीत करण्यात आले असुन तिघांवर मुख्याधिकारी बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून आरोग्य निरीक्षक धनराज नारायण पाटील यांचेसह एस.टी. सावळे, गौतम निकम यांचे विरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.