अंबाजोगाई:रणजित डांगे― राज्य शासनाने ऊसतोड मजुर व कामगारांना घरी जाण्यासाठी परवानगीचे नुकतेच आदेश काढले.या आदेशानुसार ऊसतोड कामगार सुखरूपपणे घराकडे पोहोचू लागले आहेत.बुधवार,दि.22 एप्रिल रोजी राञी 10.30 वाजता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे व त्यांच्या सहकार्यांनी ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.त्यांना सोशल डिस्टन्स पाळून भोजनाचे पॅकेट,सॅनेटायझरचे वाटप करून स्वागत केले.तर प्रशासनाचे वतीने मास्क देण्यात आले.
यावेळी संजय गंभीरे यांच्या समवेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे,नगररचनाकार अजय कस्तुरे,स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे,तलाठी सचिन केंद्रे, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि संजय गंभीरे मिञ मंडळाचे विशाल मुंदडा,राजेश भिसे,रवी लाड,राहूल शेळके,महेश पवार,ऊसतोड मुकादम आदींची उपस्थिती होती.प्रारंभी या ऊसतोड कामगारांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लोमटे यांच्या पथकामार्फत आरोग्य तपासणी करून सदरील ऊसतोड कामगारांना पुढील 14 दिवसांकरीता क्वारंटाईन करण्यात आले आहे.
स्वत:सह कुटूंबाची काळजी घ्या-खा.डॉ. प्रितमताईंच्या सुचना
=================अंबाजोगाईतील भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांना फोन करून बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी संवाद साधला विचारपुस केली.कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या विविध भागात अनेक ऊसतोड कामगार अडकून पडले होते.लोकनेत्या पंकजाताईच्या पाठपुराव्यामुळे ऊसतोड कामगार आपल्या गावच्या दिशेने निघाले आहेत.पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार भाजपचे कार्यकर्ते बीड जिल्ह्यात आलेल्या मजूरांना सॅनिटायझार,मास्कचे व भोजन वाटप करीत आहेत.तसेच या कार्यकर्ते व ऊसतोड कामगारांशी स्वत: खा.प्रितमताई संवाद साधत असून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत.त्यावर लॉकडाऊनच्या सुरूवाती पासून ते परतीच्या प्रवासापर्यंत सर्व व्यवस्था व काळजी घेणा-या लोकनेत्या पंकजाताई व खा.प्रितमताई मुंडे यांच्याप्रती ऊसतोड कामगार कृतज्ञ भाव व्यक्त करीत आहेत.
ऊसतोड कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य करणार
लोकनेत्या पंकजाताई व खा.प्रितमताई मुंडे यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून ऊसतोड कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य करीत आहोत.त्यांच्या राहण्याची अतिशय तत्पर व्यवस्था जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासन करीत आहे.आम्ही आवश्यकतेनुसार प्रशासनास व ऊसतोड मजुर बांधवांना सर्वोतोपरी सहकार्य करणार आहोत.
-संजय गंभीरे,(शहराध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा,अंबाजोगाई.)