सोयगाव: लॉकडाऊन दरम्यान पोलिसांचा सेल्फी केंद्र ,उल्लंघन करणाऱ्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुकाभर कोरोना संक्रमणाचा विळखा दूर करण्यासाठी लॉकडाऊन मधील दुसरा विशेष १०० टक्के लॉकडाऊन शुक्रवारी १०० टक्के यशस्वी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी दिली.दरम्यान या विशेष लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी नवीन उपक्रम हाती घेवून शहरातील शिवाजी चौकात व्हायरल सेल्फी केंद्र कार्यान्वित करून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र या सेल्फी केंद्रासमोर घेण्यात येवून सदरील छायाचित्र व्हायरल करण्याचा उपक्रम पोलीस आणि नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आल्याने शहरात छायाचित्र व्हायरल होवू नये म्हणून अनेकांनी घरातच राहण्याचे पसंद केले.
सोयगावसह तालुक्यात शुक्रवारी विशेष लॉकडाऊन शंभर टक्के पाळण्यात आला.दरम्यान ग्रामीण भागातल रस्ते आठवड्यापासून बंदच झाले आहे.त्यामुळे भटकणाऱ्याची संख्या कमी झाली होती.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पहाटेपासून तालुक्यात गस्त घालून जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.सोयगाव,जरंडी,माळेगाव,निंबायती,कंकराळा,बहुलखेडा,कवली,घोसला,तिडका,गोंदेगाव,बनोटी आदि भागात लॉक डाऊन पाळण्यात आला.त्यामुळे शुक्रवारी रस्त्यावर कुनुही आढळून आलेले नव्हते,तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार मकसूद शेख,सतीश देशमुख,विठ्ठल जाधव आदींचे पथक लॉकडाऊन वर लक्ष ठेवून होते,पोलिसांनी तालुक्यात कडेलोट बंदोबस्त ठेवला.