कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाबीड तालुका

लिंबागणेश येथिल ऊसतोड मजुरांना स्वप्निलभैय्या गलधर यांनी किराणा,धान्य, भाजीपाला वाटप केले

लिंबागणेश:डॉ गणेश ढवळे―आज सकाळी भालचंद्र महाविद्यालयात होम क्वारंटाईन केलेले ऊसतोड मजुरांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना किराणा सामान ,धान्य व भाजीपाला संपल्याचे सांगत मागणी केली , यावेळी. तेलप पी.जे. ग्रामविकास अधिकारी यांनी आम्ही तूम्हाला किराणा सामान , भाजीपाला यासाठी आमच्याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी निधि उपलब्ध करून दिली नाही . त्यामुळे मी काहीही देऊ शकत नाही तसेच धान्य विषयी तलाठी पगारे यांना बोला मी स्वस्त धान्य दुकानदार यांना लेखी नोटीसव्दारे आपणास महाविद्यालयात धान्य पोहोच करण्याचे सांगितले आहे.

स्वप्निलभैय्या गलधर यांनी किराणा,धान्य , भाजीपाला स्वखर्चाने वाटप

ग्रामविकास अधिकारी व तलाठी यांनी मदत करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सरपंच सौ.निकिताताई स्वप्निल गलधर यांना वस्तूस्थिती सांगुन विनंती केल्यानंतर प्रकृतिस्वास्थमुळे रजा असल्यामुळे मी स्वत:येऊ शकत नाही परंतु मी सर्व व्यवस्था करते,आपण काळजी करू नका असे सांगितले,त्यानंतर दुपारी २ वाजता स्वप्निलभैय्या गलधर भाजपा तालुकाध्यक्ष बीड यांनी सर्व ऊसतोड मजुरांची यादी नुसार प्रत्येक कुटुंबाला १४ दिवस म्हणजेच होम क्वारंटाईन कालावधीत लागणारी आवश्यक सामान स्वखर्चाने गहू , तांदूळ , भाजीपाला , तसेच कीराणा सामान मधे तेल,तिखट,मिठापासून साबण ,काडीपेटी पर्यत वस्तू किट भेट स्वरुपात सामाजिक अंतर राखून भाजपा नेते स्वप्निलभैय्या गलधर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले ,यावेळी उपसरपंच शंकर वाणी , ग्रा.पं.कर्मचारी जिवन मुळे , सुखदेव वाणी , गणेश थोरात , स्वस्त धान्य दुकानदार भालचंद्र गिरे , कोतवाल बाळु काका थोरात , शेख अख्तर , लखन राऊत , सुरज कदम , बबन आबदार औंदुंबर नाईकवाडे, बबन आबदार, दादा गायकवाड , दशरथ दाभाडे , राजेंद्र ढास ,केशव गिरे , संभाजी कोटुळे , आणि डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button