महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अंबाजोगाईत 51 युवकांचे रक्तदान ; 21 गरजूंना मदत

अंबाजोगाई:रणजित डांगे―सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर यांची जयंती रविवार,दि.26 एप्रिल रोजी शहरातील घरा-घरात उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 51 युवकांनी रक्तदान केले.तर आणखी 35 जण टप्प्याटप्प्याने रक्तदान करणार आहेत. एकूण 86 जणांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवली आहे.21 गरजू कुटूंबांना घरपोहोच किराणा सामानाचे किट देण्यात येणार आहेत अशी माहिती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दिली आहे.

संचारबंदीमुळे नागरिकांनी आपल्या घरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना
नागरिकांनीही आपल्या घरात कुटूंबियांसह महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन केले.काही जणांनी त्यांच्या ग्रंथाचे वाचनही केले.उत्सव समितीच्या वतीने प्रारंभी
अंबाजोगाई शहरातील श्री शंभुलिंग शिवाचार्य मठात जन्मोत्सवानिमीत्त विधीवत पुजाविधी करण्यात आला.
त्यानंतर महात्मा बसवेश्वर चौकातील नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी दोन दिवसांपूर्वी युवकांनी रक्तदान करण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले होते.त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.शेकडो युवकांनी नांवनोंदणी केली.येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीत रविवार,दि.26 एप्रिल रोजी सकाळी डॉ.सिध्देश्वर बिराजदार,डॉ.विनय नाळपे, विनोद पोखरकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीरास प्रारंभ झाला. तोंडाला मास्क बांधून व सामाजिक आंतर ठेऊन (सोशल डिस्टन्स) तसेच रूग्णालयाने ठरवून दिलेल्या ठराविक वेळेनंतर तालुक्यातील 51
युवकांनी रक्तदान केले.आणखी 35 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली.कोरोना संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोजंदारी करून आपले कुटूंब चालविणाऱ्या काही गरीबांची उपासमार होऊ नये म्हणून महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने 21 गरजूंच्या घरी जाऊन किराणा सामानाच्या कीट्स देण्यात येणार आहेत.या सामाजिक उपक्रमासाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद पोखरकर,सचिव सूरज आकुसकर,प्रसाद कोठाळे,गणेशमामा काळे, सचिन गौरशेटे,शाम आकुसकर,योगेश मोदी, काशीनाथ तोडकर,अमोल व्यवहारे,योगेश पोखरकर, वैभव पोखरकर,धारेकर, देशमाने,मनोज बरदाळे, विकास आकुसकर,जगदीश ढेले,अक्षय आकुसकर,संजय गिराम,दिपक आकुसकर,धनराज पवार,गणेश रुद्राक्ष,रवींद्र राठोड,प्रशांत जाधव,जैन संघटनेचे निलेश मुथा,जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व महात्मा बसवेश्वर बचतगट यांनी सहकार्य केले.

जयंती उत्सवातून समाजसेवा

महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन,ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी विविध समाज उपयोगी
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.यापुर्वी रक्तदान शिबिर,गुरांना चारा वाटप,गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त स्पर्धा व त्यांचे सत्कार, समाजातील व्यक्तींना समाजभुषण पुरस्कार, पाण्याचे हौद वाटप,भजन स्पर्धा आदींचे आयोजन केले आहे.तसेच 251 सदस्य असलेल्या मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या महात्मा बसवेश्वर बचतगटाच्या माध्यमातून युवा उद्योजक व सुशिक्षित तरूणांना वेळोवेळी कर्ज वाटप केले.जयंती उत्सवातून बांधिलकी जोपासत समाजसेवा करण्याचा विधायक प्रयत्न केला जात आहे.

-विनोद पोखरकर (अध्यक्ष),सुरज आकुसकर (सचिव) महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती.)