पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे सौंदाना येथील शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला आग ; आगविजवण्यासाठी सहकारमहर्षी रामकृष्ण बांगर आले मदतीला धावून

पाटोदा:गणेश शेवाळे―पाटोदा तालुक्यातील सौंदना येते शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला आग लागली यामुळे सौंदना गावात मोठा गोंधळ उडाला आग विझवण्यासाठी लोक पळापळ करू लागले माञ आग काय आटोक्यात येत नव्हती तेवढयात तेथे पाटोदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी रामकृष्ण बांगर काही कामा निमित्त आले असताना ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली त्यावेळी सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनी समयसूचकता दाखवत तात्काळ अग्निशामक दलाला फोन लावून घटना सागताच काही वेळातच सौंदाना येते अग्निशामक दलाची गाडीने येऊन आग विजवली यामुळे मोठा अनर्थ टळला तोपर्यंत सहकार महर्षी रामकृष्ण बांगर तिथेच उभा होते आग विजल्यामुळे सगळ्या गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला माञ कोरोना मुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांला शॉर्टसर्किटमुळे ट्रॅक्टर जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनी धीर देत संबंधित सज्जाच्या तलाठ्यास बोलावून घेऊन पंचनामा करून घेऊन लवकर या शेतकऱ्यांला मदत मिळवून द्यावा अशी विनंती केली यामुळे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांचे काम पाहून शेतकरी समाधानी झालातर सौदानाकरांनी बांगर यांचे आभार मानले.

Back to top button