अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

बीड जिल्हा काँग्रेसचे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन

अंबाजोगाई:रणजित डांगे― बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त रविवार,दिनांक 26 एप्रिल रोजी सर्व जनतेस शुभेच्छा देवून अभिवादन करण्यात आले.

अंबाजोगाई शहरातील सहकार भवन येथे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस शुभेच्छा देवून अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक मनोज लखेरा,सुनिल व्यवहारे,राणा चव्हाण,चेतन मोदी,शुभम मोदी हे
उपस्थित होते.

म.बसवेश्वरांची सदाचार,नैतिकता आणि विवेकाने वागायची शिकवण

महात्मा बसवेश्वर यांची शिकवण ही सामान्य माणसासाठी आहे.ती सहज साधी आणि सोपी आहे.संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.कष्टकरी,दीनदलित, आदिवासी,अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार यांना म.बसवेश्वर यांनी एकत्र केले.त्यांना जीवन तत्वज्ञान सांगितले.देहच देवालय आहे.एकत्र या चर्चा करा.सुसंवाद करा.स्त्रियांना समान अधिकार द्या.जातीभेद,वर्णभेद,लिंगभेद करू नका.स्वकष्टावर जगा.कष्ट करा. पर्यावरण रक्षण करा.अनुभव मंटपात बसा.प्रश्न उत्तरे करा,चर्चा करा.अस्पृश्यता पाळू नका.माणसाला माणसाप्रमाणे वागवा.दया हाच धर्म आहे.सदाचाराने वागा.निती-नैतिकता आणि विवेकाने वागा.अंधश्रद्धा सोडून द्या.प्राणीमात्रांवर दया करा.भुकेलेल्याला अन्न द्या.अनावश्यक खर्च करू नका.शेत हे पावनभूमी आहे.विसंगत व्यवहार सोडून द्या.निसर्ग नियमाप्रमाणे वागा.चारित्र्य सांभाळा.ज्ञानी व्हा,नैतिक बना,विवेकी बना,स्वतःमध्ये बदल करून दोष दूर करा अशी सहज साधी शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली आहे.आपण ही शिकवण आत्मसात करून आचरणात आणली पाहीजे.
-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी.)