राजकारण

भाजपाची चार वर्षातली पापं धुवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी- धनंजय मुंडे

मोदी सरकारचा ‘अंतिम' अर्थसंकल्प

प्रतिनिधी दि.०१: मोदी सरकारनं आज सादर केलेला अर्थसंकल्प ‘चुनावी जुमला’असून गेल्या चार वर्षातली सरकारची पापं धुवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा ‘अंतिम’अर्थसंकल्प आहे असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर पोस्ट केले आहे.

सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधीत कोणतीच घोषणा नाही. दीडपट हमीभाव देण्यासाठी तरतूद नाही. भावांतर योजना नाही. नाशवंत पिकासाठी कोणतेच संरक्षण नाही. उलट महिन्याला ५०० रूपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम या सरकारने केले आहे. बहुतांश बँकांमध्ये बचत खात्यात किमान 3 हजार रुपये शिल्लक ठेवावी लागते. किमान शिल्लक नसल्यास बँक दंड आकारते, अशा स्थितीत गरीब शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेल्या दरमहा ५०० रुपयांचा त्याला उपयोग होण्याऐवजी दंड बसण्याचीच शक्यता अधिक असल्याचे म्हटले आहे.

गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी भाजप सरकारच्या काळात निर्माण झाल्याचे नुकतेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिलेल्या मोदींने यावर भाष्य करणं अपेक्षित होतं. सच हमेशा कडवा होता है, त्यामुळेच यांची बोलती बंद झाली असणार.आजचा अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनाच खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे बजेट आहे की सुरज बडजात्याचा हॅप्पी एंडिंग चित्रपट? गेल्या साडेचार वर्षात जाहीर केलेल्या योजनांची अजून अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे जनतेचा रोष सरकारवर कायम राहणार. मतांवर डोळा ठेवून अनेक घोषणा सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या असल्या तरी पैसे कोठून येतील? आर्थिक तूट कशी भरली जाईल? याचेही उत्तर मिळालेले नाही. पराभव समोर दिसत असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर जुमलेबाजी करणारं बजेट भाजपने मांडलं आहे. पण आता जुमलेबाजीला जनता भुलणार नाही असा उल्लेख केला आहे.

मोदी सरकारचा ‘अंतिम' अर्थसंकल्प भाजपाची चार वर्षातली पापं धुवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी मोदी सरकारनं आज...

Posted by Dhananjay Munde on Friday, 1 February 2019

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.