सोयगाव:दि.२८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―गोंदेगाव हे सोयगाव तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराजवळ असून पाचोरा येथे एका रुग्णाला कोरोका संक्रमण झाले असून जवळच असलेले गोंदेगाव येथील नागरिक शासनाच्या आदेशाला मानत नसल्याचे दिसत आहे. गावातील काही जागरूक नागरिक त्यांना समजवण्यासाठी गेले असता त्यांनाच हे दुकानदार शिवीगाळ करीत असल्याचे म्हणणे गोंदेगाव येथील समाधान सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे.
आज सकाळी अरविंद कापड दुकान हे लॉकडाऊन चे नियम पाळत नसल्याने या विषयी समाधान सूर्यवंशी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या कडे सोशल मीडियाद्वारे तक्रार केली असता दुकानदार यांनी समाधान सूर्यवंशी यांना शिवीगाळ केली या प्रसंगी गावातील नागरिक उपस्थित होते. आता यांच्यावर काय कारवाही करण्यात येईल या कडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.